उद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट होतेय, आज ना उद्या ते बाहेर पडतील; संजय काकडेंचा बॉम्बगोळा

भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे. (sanjay kakade's big statement on cm uddhav thackeray)

उद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट होतेय, आज ना उद्या ते बाहेर पडतील; संजय काकडेंचा बॉम्बगोळा
sanjay kakade
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 11:53 AM

पुणे: भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे. मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं मोठं विधान संजय काकडे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (sanjay kakade’s big statement on cm uddhav thackeray)

संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मोठं विधान केलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, असं संजय काकडे म्हणाले. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही ते म्हणाले.

नवाब मलिकांचा टोला

संजय काकडे यांच्या या वक्तव्याची राष्ट्रवादीने गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काकडे यांच्या विधानावर जहरी टीका केली आहे. भाजपचे सरकार असताना केवळ सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्यांनी राजकीय भाष्य करू नये. या धंदेबाज लोकांनी राजकारणात पडू नये. त्यांनी त्यांचं काम पाहावं. आमचं सरकार कसं चालवायचं हे आम्ही पाहू, असा सल्ला मलिक यांनी काकडेंना दिला आहे.

प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान, संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आज हे मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (sanjay kakade’s big statement on cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

PM निवासस्थान, संसंद भवनाचं काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करा; रोहित पवारांचा भातखळकरांना टोला

मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची टीका

तामिळनाडूत स्टॅलिन राज; 33 आमदारांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

(sanjay kakade’s big statement on cm uddhav thackeray)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.