VIDEO: केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचारी, राऊतांच्या रडारवर तपास यंत्रणा; आज कोणता बॉम्ब टाकणार?
ईडीबाबत (ed) मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (pm narendra modi) 13 पानांचं पुराव्यासह पत्रं दिलं आहे. अनेकांचा आग्रह आहे की ते पत्रं मीडियासमोर ठेवावं, देशासमोर ठेवावं. ते पत्रं आज मी तुम्हाला देईन.
ठाणे: ईडीबाबत (ed) मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (pm narendra modi) 13 पानांचं पुराव्यासह पत्रं दिलं आहे. अनेकांचा आग्रह आहे की ते पत्रं मीडियासमोर ठेवावं, देशासमोर ठेवावं. ते पत्रं आज मी तुम्हाला देईन. त्या पत्रावरून तुम्हाला कळेल की केंद्रीय तपास यंत्रणा किती भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत. कुणाच्या नियंत्रणाखाली काम करतात. राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणून या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात. हे सर्व त्या पत्रात आहे. हे टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग बाहेर काढणार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र, तपास यंत्रणांवर कोणता बॉम्ब टाकणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. त्यामुळे राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. टार्गेट कशा करता? जे सत्य आहे. जो अन्याय आहे, त्यावर बोलणार आहे. समोरच्या काही लोकांचा अन्याय आणि भ्रष्टाचार बाहेर आणण्याला टार्गेट म्हणू नका. काही विशिष्ट लोकं आमच्यावरती हल्ले करतात. त्याचवेळी मोठमोठे लोक घोटाळे करून नामानिराळे राहतात. त्यांचे मुखवटे फोडले पाहिजेत, असं राऊत यांनी सांगितलं.
एक्झिट पोल खोटे ठरतील
यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या एक्झिट पोलवरही भाष्य केलं. एक्झिट पोलवर जाऊ नका. यापूर्वी एक्झिट पोलचा कसा फज्जा उडालाय हे आपण पाहिलंय. प्रत्यक्ष मतदानातून जे बाहेर येतंय त्यावर आपण मत व्यक्त करूया. मला अजूनही खात्री आहे या देशात अनेक राज्यात प्रस्थापिंताविरोधात राग आणि संताप आहे. ते या मतपेटीतून स्पष्ट दिसेल. ईव्हीएम उघडल्यावरच लोकांच्या मनात काय आहे हे कळेल. एक्झिटपोल खोटं ठरतील असं मला वाटतं, असं त्यांनी सांगितलं.
समान निधी मिळालाच पाहिजे
शिवसेनेच्या 25 आमदारांनी निधी वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या या तक्रारीचं राऊत यांनी समर्थन केलं. आमदारांनी निधीबाबत काही मत व्यक्त केलं ते मला माहीत आहे. त्यांनी व्यक्त केलेलं मत योग्यच आहे. प्रत्येक आमदाराला मग तो कोणत्याही पक्षाचा असो, प्रत्येकाला निधी मिळालाच पाहिजे. तो त्यांचा हक्कच आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचीच तक्रार
Maharashtra News Live Update : राज ठाकरेंचा पुणे दौरा, शहरात मोठमोठे फ्लेक्स