Sanjay Raut : ‘एका ओवैसीला यूपीत लढवलं, आता नवहिंदू ओवैसीला शिवसेनेविरोधात लढवत आहेत.’, संजय राऊतांची राज ठाकरे आणि भाजपवर हल्लाबोल

नवहिंदू ओवैसींना महाराष्ट्रात शिवसेना विरोधात लढवून हिंदूंचंच नुकसान करण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. डोंबिवलीत आयोजित मिसळ महोत्सवात संजय राऊत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि भाजपवर हल्ला चढवला.

Sanjay Raut : 'एका ओवैसीला यूपीत लढवलं, आता नवहिंदू ओवैसीला शिवसेनेविरोधात लढवत आहेत.', संजय राऊतांची राज ठाकरे आणि भाजपवर हल्लाबोल
राज ठाकरे, संजय राऊतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 8:15 PM

मुंबई : राज्यात मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेला कोंडीत पडकायला सुरुवात केलीय. राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत सभांचा धडाका लावलाय. या सभेत ते महाविकास आघाडी आणि खास करुन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडत आहेत. राज यांनी उद्या औरंगाबादेतही एक सभा होणार आहे. त्यावेळी ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांचा नवहिंदू ओवैसी असा उल्लेख करत जोरदार हल्ला चढवलाय. एका ओवैसीला उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने वापरण्यात आलं निवडणुका जिंकण्यासाठी. त्याच पद्धतीनं नवहिंदू ओवैसींना महाराष्ट्रात शिवसेना विरोधात लढवून हिंदूंचंच नुकसान करण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. डोंबिवलीत आयोजित मिसळ महोत्सवात संजय राऊत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि भाजपवर हल्ला चढवला.

‘कुणी कितीही नकला केल्या तरी बाळासाहेब ठाकरे एकच’

संजय राऊत म्हणाले की, ‘एक हिंदू ओवैसी आणि एक मुस्लिम ओवैसी हे दोन्ही आज महाराष्ट्रात आहे. एका ओवैसीला उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने वापरण्यात आलं निवडणुका जिंकण्यासाठी. त्याच पद्धतीनं नवहिंदू ओवैसींना महाराष्ट्रात शिवसेना विरोधात लढवून हिंदूंचंच नुकसान करण्याचं काम भाजप करत आहे. या देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच लोकांना माहिती आहे. कुणी कितीही शाली पांघरल्या, हिंदूहृदयसम्राटांच्या कुणी कितीही नकला केल्या तरी बाळासाहेब ठाकरे एकच’, असा खोचक राऊतांनी लगावलाय.

भाजपचं हिंदुत्व तकलादू – राऊत

संजय राऊत यांनी भाजपच्या उद्या होणाऱ्या सभेवर आणि भाजपच्या हिंदुत्वावर जोरदार हल्ला केला आहे. आम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोणी घेरत नाही. हिंदुत्वावरून घेरणाऱ्यांचा घेर मोजावा लागेल. हे घेरणंबिरणं शब्द आहेत, ते शिवसेनेच्या बाबतीत ते तकलादू आहेत. हे घेरणं, कोंडी करणं वगैरे वगैरे शब्द शिवसेनेला लागू होत नाही. ते महाराष्ट्र पाहतोय उगाच प्रश्न उपस्थित करू नका, असं सांगतानाच नकली हिंदुत्ववादी, डुप्लिकेट हिंदुत्वाद्यांची चिंता करू नका. ते येतात जातात. आपल्याला राहायचं आहे. शिवसेना हिंदुत्वाची गर्जना करत राहिल आपण लढत राहू असं उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते बुस्टर डोस स्वत: घेतात. काही लोक स्वत:ला साप चावून घेतात. तसं ते करत आहे. त्यामुळे त्यांना बुस्टर डोसची गरज आहे. त्यांचं हिंदुत्व तकलादू असल्याने त्यांना नव हिंदुत्ववाद्यांच्या बुस्टर डोस गरज आहे. कुणी स्वत:चं मनोरंजन करत असेल तर करू द्या, असा असा टोलाही त्यांनी लगावलाय.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.