VIDEO: ठाकरे कुटुंबाला बदनाम करून उद्धव ठाकरे यांना खुर्ची खाली करण्यास भाग पाडायचे आहे का?; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बदनाम करून उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना खुर्ची खाली करण्यास भाग पाडायचे आहे का? विरोधकांना उसकवून संजय राऊत यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे का?.
कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बदनाम करून उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना खुर्ची खाली करण्यास भाग पाडायचे आहे का? विरोधकांना उसकवून संजय राऊत यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असा सवाल करतानाच तुमच्या गळ्याशी आल्यानंतर हे सगळं तुम्हाला आठवलं का? तुम्ही भाजपच्या नेत्यांवर आरोप केल्यावर मी शांत बसायचं हे कसं होईल? अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक आहेत, हे सगळे भांबावून गेले आहेत. पक्षाच्या नेत्यांना बोललेले आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (sanjay raut) यांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. तसेच मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझा आणि राऊत किंवा पवार यांच्या बांधला बांध नाही. राऊतांना शेतीतील कळत नाही. त्यामुळे त्यांचा प्रश्नच येत नाही. पण किरीट सोमय्या (kirit somaiya) हे माझे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे माझे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्यावर आरोप केल्यावर मी बोलायचे नाही? असा सवालच पाटील यांनी राऊत यांना केला.
कोण अमोल काळे? त्यांच्यावर काय आरोप आहेत हे मला माहीत नाही. 27 महिने यांचे सरकार आहे, इतके वर्षे काय झोपा काढत होता काय? सरकारकडे तक्रार करावी. 27 महिने या गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी काळेप्रकरणावर केला. तसेच राजकारणात टीका करताना काय-काय शब्द काढतात? धमक्या काय देतात, असंही ते म्हणाले.
ही आमची संस्कृती नाही
अनिल देशमुख आतमध्ये आहेत तर सगळ्यांनी हात काढून घेतले. ही आमची संस्कृती नाही. अब्रुनुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्याने तुम्ही मरणार, अशी अवस्था तुम्ही करून ठेवलीय, अशी टीकाही त्यांनी केली.
राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत यांनी आज सकाळी किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी सोमय्या प्रकरणात न पडण्याचा चंद्रकांतदादांना सल्लाही दिला होता. किरीट सोमय्यांनी पवईतील पेरूबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आहेत. एक दोन नाही ट्रकभरून कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ही सर्व कागदपत्रं मी आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे. तसेच आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटायला जात असून त्यांच्याकडेही ही कागदपत्रे देणार आहे, असं सांगतानाच चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात पडू नये. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिला आहे. सोमय्यांची एकूण 211 प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. त्यांनी एकूण सात साडेसात हजार कोटींचा हा घोटाळा केला आहे. त्यांनी खुशाल माझ्याविरोधात कोर्टात जावं, असं आव्हानच त्यांनी दिलं होतं.
संबंधित बातम्या:
अमोल कोल्हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, कोणत्या वाहिनीवर दिसणार मालिका