अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही, राऊत कडाडले

दैनिक सामनातील अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. सामनाच्या संपादक सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती आहे. याचविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही, राऊत कडाडले
संजय राऊत आणि रश्मी ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 12:45 PM

मुंबई :  दैनिक सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. सामनाच्या संपादक सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती आहे. याचविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी हा संजय राऊत घेतोय’, असं ते म्हणाले.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून शिवसेना-नारायण राणे यांच्यातला वाद चांगलाच चिघळला आहे. दोन्ही बाजूने टीकेची झोड उठतीय. आरोप प्रत्यारोपांची राळ उडतीय. या सगळ्यात एकमेकांना लक्ष्य करताना शेलक्या शब्दांचा प्रयोग होत आहे. राणे कुटुंब आणि सामना अग्रलेखातून देखील असे शब्दप्रयोग होत आहेत. परंतु राऊतांचे अग्रलेखातील घाव विरोधकांच्या वर्मी लागत आहेत.

अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही

याच भाषेवर आक्षेप नोंदवत सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात भाजपच्या तक्रार नोंदविण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचविषयी आज संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं असता राऊतांनी आक्रमक उत्तर दिलं. सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे…. त्या अग्रलेखांची जबाबदारी या संजय राऊतची… रश्मी ठाकरेंची नाही, असं राऊत म्हणाले.

‘केंद्रीय मंत्री म्हणून काम करा,बेताल बडबड करू नका’, राणेंना सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघूद्योग खात्यासाठी नारायण राणे यांनी चांगले काम करुन देश पुढे न्यायला हवा. पण ते महाराष्ट्रात येऊन केवळ बेताल बडबड करणार असतील तर शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात विधायक टीकेची परंपरा आहे. तशी टीका झाल्यास शिवसेना त्याचे स्वागत करेल, असेही राऊत यांनी सांगितले.

(Sanjay Raut is a responsible for the Saamana article over Answer the question on Rashmi Thackeray)

हे ही वाचा :

मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपची तक्रार, तेव्हा तुम्ही झोपला होतात काय?; राऊत कडाडले

मी गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री का केलं, राणेंच्या खड्या सवालाला शिवसेनेचा पहिला जवाब!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.