अविश्वास प्रस्ताव का आणला?, विरोधकांची काय होती खेळी?; संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?

काही झालं तर नेहरू. पाऊस जास्त पडला तरी नेहरूच जबाबदार. कमी पडला तरी नेहरूच जबाबदार. दुष्काळ पडला तरी नेहरूच जबाबदार का? तुम्ही नेहरूंसमोर स्वत:ला खुजे समजत आहात.

अविश्वास प्रस्ताव का आणला?, विरोधकांची काय होती खेळी?; संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 11:16 AM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : संसदेत काल अविश्वास ठरावावर मतदान झालं. यावेळी हा ठराव फेटाळून लावण्यात आला. विरोधकांनी हा ठराव आणला होता. केंद्र सरकार विरोधात अविश्वास दाखवण्यासाठीचा हा ठराव होता. संख्याबळ कमी असतानाही विरोधकांनी हा ठराव मांडला. आपला अविश्वास ठराव फेटाळला जाऊ शकतो किंवा अविश्वास ठरावात आपल्याला पराभूत व्हावं लागू शकतं हे माहीत असूनही विरोधकांनी हा ठराव आणल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विरोधकांनी हा ठराव का आणला अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत यांनी थेट मोठा गौप्यस्फोटच केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरवर बोलत नाहीत. मणिपूरच्या मुद्द्यावर बोलायला घाबरत आहात आणि पळून जात आहात. त्यामुळे तुमच्यावर नो कॉन्फिडन्स मोशन आणण्यात आला, असा गौप्यस्फोट करतानाच तुम्हाला सभागृहात येऊन मणिपूरची स्थिती काय आहे, तिथली परिस्थिती काय आहे, तिथे तुम्ही काय केलं? याची माहिती व्हावी म्हणून अविश्वास ठराव आणला गेला. कारण तुम्ही सभागृहात येत नव्हता. तुम्ही राज्यसभा आणि लोकसभेत येत नव्हता. त्यासंजय राऊत मुळे मणिपूरच्या जनतेसाठी आणि देशाच्या हितासाठी आम्हाला हा अविश्वास ठराव आणावा लागला, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस डोक्यातून जात नाहीये

मोदी 10 वर्षापासून पंतप्रधान आहे. दोन निवडणुका जिंकल्यानंतरही त्यांच्या मनातून आणि हृदयातून काँग्रेस जात नाहीये. याचा अर्थ काँग्रेस मजबूत होत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाने मोदींच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून काँग्रेस जात नाहीये. तुम्ही काँग्रेसला पराभूत केलंय ना? मग विसरून जा त्यांना. तुमचं काम सांगा ना? तुमच्या कामाची जंत्री द्या, असा खोचक सवाल राऊत यांनी केला.

मणिपूरचा प्रश्न का सोडवला नाही?

तुम्ही काँग्रेस आणि नेहरूंबद्दल ढोल कशाला पिटत आहात? तुमचं सरकार आहे. तुम्ही म्हणताय तर नेहरुंची चुकीची झाली असेल. मग त्या चुका तुम्ही सुधारा ना. नेहरूंमुळे मणिपूरची समस्या आहे, तर तुम्हाला दहा वर्ष दिले तुम्ही काय केलं मणिपूरसाठी? वाजपेयी सहा वर्ष सत्तेत होते. मोरारजी देसाई चार वर्ष होते. आणखी काय पाहिजे? व्हीपी सिंग अडीच वर्ष होते. एवढी सरकारे नेहरुंच्या विरोधात होती तर मणिपूरचा प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल त्यांनी केला.

तुम्ही स्वत:ला खुजे समजत आहात

काही झालं तर नेहरू. पाऊस जास्त पडला तरी नेहरूच जबाबदार. कमी पडला तरी नेहरूच जबाबदार. दुष्काळ पडला तरी नेहरूच जबाबदार का? तुम्ही नेहरूंसमोर स्वत:ला खुजे समजत आहात. त्यामुळेच तुम्ही सतत नेहरूंचं नाव घेत आहात. नेहरूंनी देश घडवला. तुमच्याकडून तेही होत नाही. म्हणूनच तुम्ही नेहरूंवर टीका करत आहात, असा घणाघाती हल्लाच त्यांनी मोदींवर चढवला.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.