Special Report : ‘खंजीर’ रिर्टन्स ! संजय राऊत यांच्याकडून शिंदे गटावर हल्लाबोल
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाआधीच, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी केली. मात्र यावरुन संजय राऊतांनी पुन्हा एकदा खंजीरवरुन टीका केलीय.
मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाआधीच, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी केली. मात्र यावरुन संजय राऊतांनी पुन्हा एकदा खंजीरवरुन टीका केलीय. खंजीर बाजूला ठेवून स्मारकावर या, अशी बोचरी टीका राऊतांनी केली. त्यानंतर खंजीरवरुन वार-पलटवार रंगलाय.
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या एक दिवस आधीच, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी केली. पण ही पाहणी करण्याआधीच, खंजीर बाजूला ठेवून स्मारकावर या अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. खंजीरवरुन टीका केल्यानंतर, शिंदे गटासह भाजपच्या चंद्रकांत पाटलांनीही राऊतांवर पलटवार केला.
याआधी खंजीरवरुन ठाकरे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध बरेचदा रंगलंय. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द मोडल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे गटाकडून भाजपवर खंजीर खुपल्याचा आरोप झालाय.
शिंदेंच्या स्मारकाची पाहणीवरुन राऊतांनी खंजीरवरुन जळजळीत टीका केली. तर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच पूर्ण होणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय.
17 नोव्हेंबरला बाळासाहेबांचा 10 वा स्मृतिदिन आहे..स्मृतिदिनाला ठाकरे कुटुंबांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कवर दाखल होतात…पण संघर्ष टाळण्यासाठी शिंदेंनी एक दिवसाआधीच बाळासाहेबांना अभिवादन करत, स्मारकांच्या कामाची पाहणी केली.