हे तर भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र; संजय राऊतांचा दावा

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. (sanjay raut slams international media on corona crisis in india)

हे तर भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र; संजय राऊतांचा दावा
शिवसेना नेते संजय राऊत
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 10:50 AM

मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. (sanjay raut slams international media on corona crisis in india)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर दावा केला. राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी मतभेद विसरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा देशाचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही. विदेशी सोशल मीडिया, विदेशी मीडियात भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यातून भारताचं सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे षडयंत्रं असू शकतं. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्रं येऊन लढलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

मोदी सूचना गंभीरपणे घेतील

मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाबाबत व्यक्त केलेली भावना आम्ही आधीपासूनच मांडत होतो. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावं हे योग्य नाही असं आम्ही सांगत होतो. देशभरातील लोक निवडणुकीच्या प्रचाराला आले. तेच लोक देशभर गेल्याने त्यांनी कोरोना फैलावला. निवडणुका आणि कोरोनाचा काही संबंध नसल्याचं भाजपचे नेते सांगत होते. पण चित्रं वेगळं आहे. कुंभमेळ्यामुळे कोरोना फैलावला असं आपण म्हणतो. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी अनेक गोष्टी गंभीरपणे घेतात. ते मद्रास उच्च न्यायालयाच्या सूचनाही गंभीरपणे घेतील, असा विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

निवडणुक आयुक्तांना राज्यपाल करणार?

कोरोना फैलावला म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ज्या निवडणूक आयुक्तांच्या काळात कोरोनाचा फैलाव झाला. त्याच निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केलं जात आहे हे आम्ही ऐकून आहोत. एकीकडे कोर्ट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांना रिटर्न गिफ्ट देत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. (sanjay raut slams international media on corona crisis in india)

संबंधित बातम्या:

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा हस्तगत

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहार तुरुंगात कोरोना, ‘एम्स’मध्ये दाखल

VIDEO | आरोग्यमंत्र्यांना जेवायलाही वेळ मिळेना, गाडीतच बसून राजेश टोपेंचा अल्पोपहार

(sanjay raut slams international media on corona crisis in india)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.