योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल
उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभी करण्यासाठी बॉलिवूडकरांशी चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. (sanjay raut slams yogi adityanath over film city row)
मुंबई: देशात फिल्मसिटी काय फक्त मुंबईतच आहे का? तामिळनाडूतही फिल्मसिटी आहे. तिकडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाणार आहेत का? की त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (sanjay raut slams yogi adityanath over film city row)
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सवाल केला. योगी आदित्यनाथ हे साधू आहेत. महाराज आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने ते काही कलाकारांना भेटले. अक्षयकुमारलाही भेटले. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, अशी कोपरखळी लगावतानाच मुंबईतील फिल्मसिटी एका रात्रीत उभी राहिलेली नाही. अनेक वर्षाची मेहनत आणि कष्ट त्यामागे आहेत. योगी मुंबईत आले. तसे तामिळनाडूतही जाणार आहेत का? तिकडेही मोठी फिल्मसिटी आहे. की फक्त योगींनी मुंबईशीच पंगा घेतलाय?, असा सवाल राऊत यांनी केला.
तुम्ही फिल्मसिटी उभी करण्यासाठी भिंती उभ्या कराल. पानंफुलं लावाल. पण सुरक्षेचं काय? मुंबईसारखी सुरक्षा तुम्ही देऊ शकणार आहात का? फिल्म सिटीबरोबर मुंबईची व्यवस्थाही घेऊन जाणार आहात का? असा सवाल करतानाच शेवटी मुंबई ही मुंबई आहे. फिल्मसिटी उत्तर प्रदेशात घेऊन जाणं मस्करी वाटते काय? असा सवालही त्यांनी केला. (sanjay raut slams yogi adityanath over film city row)
जलसा, प्रतिक्षाही घेऊन जाणार का?
जलसा, प्रतिक्षा आणि रामायण ही केवळ बंगल्यांची नावं नाहीत तर ते फिल्मसिटीचं वैभव आहे. हे वैभव सुद्धा तिकडे घेऊन जाणार आहात का? असा सवाल करतानाच काही वर्षांपूर्वी नोएडामध्ये फिल्मसिटी उभी राहिली होती. तिचं काय झालं ते आधी सांगा, असंही ते म्हणाले.
LIVE : तुम्हाला मोठा प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर बनवा, पण त्यापूर्वी इतर राज्यांचा अभ्यास करा, नोएडातील फिल्मसिटीचं काय झालं? – संजय राऊत https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/EFjrQdOd60
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
(sanjay raut slams yogi adityanath over film city row)
संबंधित बातम्या:
अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका
उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण
बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच, शिवसेनेचं टीकास्त्र