‘फालतू गप्पा नको, बेळगाव महाराष्ट्राचे की नाही ते स्पष्ट करा’, फडणवीसांच्या टीकेनंतर राऊतांचं थेट आव्हान

बेळगाव महापालिका निवडणूक निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हा पराभव मराठी माणसाचा नाही तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा असल्याचं म्हटलंय. आता संजय राऊत यांनीही फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत भाजपलं थेट आव्हान दिलंय.

'फालतू गप्पा नको, बेळगाव महाराष्ट्राचे की नाही ते स्पष्ट करा', फडणवीसांच्या टीकेनंतर राऊतांचं थेट आव्हान
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 3:28 PM

मुंबई : बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव करत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यावरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हा पराभव मराठी माणसाचा नाही तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा असल्याचं म्हटलंय. आता संजय राऊत यांनीही फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत भाजपलं थेट आव्हान दिलंय. (Sanjay Raut’s reply to Devendra Fadnavis’s criticism on Belgaum election results)

“महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलंय.

राऊतांचं भाजपला थेट आव्हान

त्याचबरोबर “महाराष्ट्र भाजपा कडून दोन अपेक्षा आहेत, 1)बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा, 2) बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा.. आहे मंजूर? अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराच!”, असं आव्हानच राऊत यांनी महाराष्ट्र भाजपला दिलं आहे.

फडणवीसांचा राऊतांवर घणाघात

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय, अशा शब्दात फडणवीस यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी राऊतांना दिलंय.

खासदार संजय राऊतांचा संताप

बेळगाव महापालिका निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संताप व्यक्त केला होता. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील 69 लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता.

इतर बातम्या :

‘बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव’, फडणवीसांचा घणाघात

शिवाजीराजांच्या अटकेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्या जमातीने, मराठी माणसाच्या पराभवानंतर पेढे वाटले, राऊतांचा भाजपवर हल्ला

Sanjay Raut’s reply to Devendra Fadnavis’s criticism on Belgaum election results

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.