शिरसाट यांच्या नशिबी पुन्हा आले वेटींग, यावेळीही भुमरे यांनीच मारली बाजी

मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने मंत्रिमंडळात ते वेटींगवरच आहे. वेटींगचा पुन्हा एक अनुभव संजय शिरसाट यांना आला.

शिरसाट यांच्या नशिबी पुन्हा आले वेटींग, यावेळीही भुमरे यांनीच मारली बाजी
संजय शिरसाट व संदिपान भुमरेImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 1:26 PM

औरंगाबाद : गेल्या सहा-सात महिन्यांपुर्वी राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतर नाट्यात शिंदे गट आणि फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांचं सरकार सत्तेवर आलं. काही महिने दोन जणांचे मंत्रिमंडळ होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहणाऱ्या अनेक आमदारांपैकी काहींना पहिल्या विस्तारात संधी मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यातून संजय शिरसाट ऐवजी संदीपान भुमरे यांना संधी मिळाली. अन् संजय शिरसाट दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत वेटींगवर गेले. शिरसाट यांनी आपली व्यथ्या अनेक वेळा माध्यमांसमोर मांडली.

पुन्हा वेटींगचा अनुभव

अर्थात पक्षश्रेष्ठींसमोरही मांडलीच असणार. परंतु विस्तार होत नसल्याने मंत्रिमंडळात ते वेटींगवरच आहे. वेटींगचा पुन्हा एक अनुभव संजय शिरसाट यांना आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. बिडकीन येथे आयोजित निरंकारी संत समागम सोहळ्याला जाण्यासाठी ते आले होते. मुख्यमंत्री येणार म्हणून औरंगाबाद विमानतळावर मंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या आलिशान गाड्या आणल्या होत्या. दोन्ही नेत्यांच्या गाड्या या लँड रोव्हर डिफेन्डर आहेत. फक्त रंग आणि दोन्ही गाड्यांचे क्रमांक वेगळे होते.

हे सुद्धा वाचा

विमानतळावर दोन्ही गाड्या शेजारीच उभ्या होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गाडीत बसावे अशी शिरसाट व भुमरे यांची इच्छा होती. मुख्यमंत्री विमानतळाबाहेर येत असताना शिरसाट आपली गाडी घेऊन उभे होते. पण मुख्यमंत्री भुमरे यांच्या गाडीत बसले आणि बिडकीनकडे रवाना झाले.

नाराजी लपवली

एकनाथ शिंदे भुमरे यांच्या गाडीत बसल्यामुळे शिरसाट थोडे नाराज झाल्याचे दिसले. पण ही नाराजी त्यांनी लागलीच लपवली. ते लगेच आपल्या गाडीत बसले अन् मुख्यमंत्र्यांच्या गाडीमागून बिडकीनकडे रवाना झाले.या प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाप्रमाणेच इथेही शिरसाट वेटींगवर ठेवल्याची चर्चा सुरु झाली.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.