Sanjay Shirsat : मुतायचे वांदे झालेत म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाट यांचे भन्नाट उत्तर, क्लिप व्हायरल
काल मंत्रिमंडळ विस्ताराच्या गडबडीत आमदार संजय शिरसाट यांना एका कार्यकर्त्याचा अचानक फोन आला. कार्यकर्त्याने मुतारी बांधा असं शिरसाट यांना सांगितलं.
मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) झालेल्या मंत्रीमंडळात (Mantraimadal) संधी न मिळालेले भाजपचे आणि शिंदे गटाचे काही आमदार अत्यंत नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी राजभवनात दोन्ही गटाच्या 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी पहिल्या टर्ममध्ये अनेक आमदारांची निराशा झाली. त्यावेळी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना सुध्दा डावलण्यात आलं. दुसऱ्या टर्ममध्ये त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. काल हा सगळा गोंधळ सुरु असताना शिरसाट यांच्या एका कार्यकर्त्याने मुतारी बांधण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी शिरसाट यांनी माझ्या इथे येऊन करं असं उत्तर दिलं. त्याचं फोन रेकॉर्डींग प्रचंड व्हायरल झालं असून त्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. शिंदे गटात अनेक आमदार सामील झाल्यापासून अनेक आमदारांच्या कॉल रेकॉर्डिंग क्लिप व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर कॉल रेकॉर्ड क्लिप प्रचंड व्हायरल
काल मंत्रिमंडळ विस्ताराच्या गडबडीत आमदार संजय शिरसाट यांना एका कार्यकर्त्याचा अचानक फोन आला. कार्यकर्त्याने मुतारी बांधा असं शिरसाट यांना सांगितलं. तसेच मुतायचे लय वांदे हायत अशी तक्रार केली. त्यावर संजय शिरसाट यांनी माझ्याकडे येऊन कर अशा शब्दातला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर ही क्लिप प्रचंड व्हायरल झाली असून अनेक जण त्यावर कमेंट देखील करीत आहेत. हा कार्यकर्ता त्यांच्या मतदारसंघातला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच काल अधिक गोंधळ असल्याने शिरसाट यांनी आमचं चाललंय काय तू विचारतोयस काय असं म्हणत माझ्याकडे येऊन कर असं उत्तर दिलं.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महिला नाही
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 41 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. ज्यामध्ये शिवसेनेतील बंडखोर गट आणि भारतीय जनता पक्षाच्या 9 सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र यामध्ये कोणत्याही महिलेचा सहभाग नाही. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. राज्यात भाजपकडे 12 महिला आमदार आहेत. शिंदे गटात दोन महिला आमदार आहेत. यासोबतच त्यांना एका अपक्ष महिला आमदाराचाही पाठिंबा आहे. यासह महाराष्ट्रात एकूण 28 महिला आमदार आहेत.