Sanjay Shirsat : राऊतांचा एखाद्या मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा, त्यांनी कधी ढेकून तरी मारलाय का?; संजय शिरसाट यांचा रोखठोक सवाल
Sanjay Shirsat : मतदार संघातील काम होत नसल्यामुळे आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. मतदारांच्या विश्वासाला तड़ा जावू द्यायचा नव्हता. उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा लोकांनी साहेबांची दिशाभूल केली.
औरंगाबाद: शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आता थेट शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत सकाळी उठून पत्रकार परिषदा घेतता. राऊतांचा मोठ्या मोर्चातील एक फोटो दाखवा. या लोकांनी कधी ढेकून तरी मारला का? आमच्यासोबतच्या चार महिलांना हे लोक वेश्या म्हणतात. असं बोलणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आम्हाला भेटत नव्हते. निवेदने देऊनही काहीच कार्यवाही व्हायची नाही. मुख्यमंत्र्यांनी तुमच्या निवेदनावर काहीच आदेश दिले नसल्याचं अधिकारी सांगायचे. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील कामे खोळंबायची. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे मात्र व्हायची. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी पसरणार नाही तर काय होईल? असा सवालच संजय शिरसाट यांनी केला आहे. ते टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते.
कधीही झेंडा हातात न घेतले आम्हाला शहाणपणा शिकवतात. काल आलेले लोक आम्हाला, शिवसैनिकांना शिकवतात. 37 वर्षे शिवसेनेत खूप चांगलं काम केलं. आज प्रवक्ते बाजू मांडतात ते नवीन आलेलं आहेत. आम्ही लढून शिवसेना जनसामामन्यात रुजवली आहे. 39 बंडखोर आमदार एकत्र राहिले याचा आनंद वाटला. एकामेकांच्या भावना आम्हाला समजाल्या. बंडखोरी केली तेव्हा भविष्यात काय होईल याची आम्हाला चिंता नव्हती. कामच होणार नव्हती तरी या सत्तेत थांबण्यात काहीच अर्थ नव्हता, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नव्हता
मतदार संघातील काम होत नसल्यामुळे आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. मतदारांच्या विश्वासाला तड़ा जावू द्यायचा नव्हता. उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा लोकांनी साहेबांची दिशाभूल केली. बंडखोरी होवून नये असं आम्हाला शेवटपर्यंत वाटत होतं. पण आम्हाला कोणी समजूनच घेतलं नाही. उलट अरेरावीची भाषा झाली. आम्हाला धमकावलं गेलं. त्यामुळे सर्वच दुखावले गेले, असंही ते म्हणाले.
गुलाबरावांची खदखद आणि फटकारे
शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत आपली खदखद व्यक्त केली. आमचं काय चुकलं? आमची कामे होत नव्हती. आम्ही अनेकवेळा उद्धव साहेबांना सांगितलं. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. कोरोना काळात एकटे एकनाथ शिंदे फिरत होते. त्यांनी सर्वांना बोलावून घेतलं. तुम्हाला किट्स हव्यात का? रेमडेसिवीर इंजेक्शने हवीत का? अन्नधान्य वाटपासाठी हवेत का? अशी विचारणा केली. कोण करतं असं? ते कोरोना काळात फिरत होते. आदित्य ठाकरे किती फिरले? शरद पवार 80 वर्षाचे आहेत. ते जळगाव जिल्ह्यात पाच वेळा आले. राजेश टोपे, धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील आमच्या जिल्ह्यात आले. पण आमचे नेते किती आले? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.