AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंद दिघे यांना दोन तासांनी डिस्चार्ज होणार होता, अचानक हार्ट अटॅक येण्याचं कारण काय?; शिरसाट यांची मोठा सवाल

बाळासाहेब ठाकरे हे आनंद दिघे यांच्या अंत्यविधीला का आले नाही त्याचे कारण मी सांगू शकत नाही, परंतु एवढा मोठा व्यक्ती, निस्वार्थी व्यक्ती, लग्न झालेलं नाही, मूल बाळ नाही, सर्व आयुष्य त्यांनी समाज सेवेसाठी झोकून दिलं. त्याकाळी त्यांची अंत्ययात्रा पाहिली असेल तर ठाण्यातील शिवसैनिकांना तो दिवस आजही आठवत असेल. कोण का नाही आलं? कशासाठी नाही आलं? यावर मी भाष्य करणार नाही, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले.

आनंद दिघे यांना दोन तासांनी डिस्चार्ज होणार होता, अचानक हार्ट अटॅक येण्याचं कारण काय?; शिरसाट यांची मोठा सवाल
anand dighe Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2024 | 6:46 PM
Share

आनंद दिघे यांच्या फक्त पायाला इजा झाली होती. दोन तासानंतर डिस्चार्ज होणार होता. डिस्चार्ज कार्डही तयार होतो. त्यांना भेटायला सर्व नेते गेले असता हसून खेळून बोलले. मग अचानक त्यांना अटॅक येण्याचं कारण काय? इंजेक्शनमध्ये काही दिलं होतं असा काही लोकांनी डाऊट व्यक्त केला. तिथल्या शिवसैनिकाला काय झालं ते समजायला पाहिजे होतं ना !. सिंघानिया हॉस्पिटल आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर बंद आहे. ते आजतागायक बंद आहे. एवढी इमोशनल घटना झाल्यानंतर हॉस्पिटल शिफ्ट होतं, ही शंका घ्यायला वाव आहे. असं असेल तर जो शिवसैनिक दिघे साहेबांच्या नावावर मोठा झाला, त्यांच्यामुळे लाखो लोकांचे कुटुंब वसलेले आहेत, त्यांच्या मृत्यूची माहिती शिवसैनिकांना मिळायला नको का? नेमकं काय झालं हे समजायला नको का?, असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. आनंद दिघे गेले हे शिवसैनिकांच्या मनाला पटतच नव्हतं. ज्यांना दोन तासानंतर डिस्चार्ज द्यायचा आहे, डिस्चार्ज पेपर तयार होत आहेत आणि दोन तासानंतर बातमी येते की दिघे साहेब गेले. कसं शक्य आहे हे? बोलता बोलता गेले म्हणजे डिस्चार्ज कार्ड तयार होतंय आणि माणूस एक्सपायर होतो हे शिवसैनिकांच्या मनाला पटणार नव्हतं. म्हणून उद्रेक झाला. घातपात झाला होता का? ही माझी शंका होती, असं संजय शिरसाट म्हणाले.

मृत्यूची चौकशी व्हायला हवी

त्या काळात आनंद दिघे यांच्या आजूबाजूला अनेक लोक होते. त्यापैकी अनेकांच्या चर्चा आहेत. मी पर्टिक्युलर कुणाचं नाव घेत नाही की यांच्यामुळे मारलं की मारलं असावं. ठाण्यामध्ये त्यांचे वर्चस्व होतं हे निर्विवाद सत्य आहे. लोक त्यांना देव समजायचे. साधा टपरीवाला असो किंवा मोठा माणूस त्यांच्या घरामध्ये आनंद दिघे यांचा फोटो असायचा. दिघे साहेब आमचे दैवत आहेत, असं मानणारा वर्ग आजही ठाण्यात आहे. जोडलेली नाळ पाहता त्यांची चौकशी व्हायला हवी अशी माझी मागणी राहील, काय जे असेल खरं खोटं एकदा लोकांसमोर येऊ द्या. आजही दिघे साहेबांचं नाव घेतलं तर अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. ते रडतात, असं संजय शिरसाट म्हणाले.

त्यामागे कोण होतं हे कळेलच

ठीक आहे साहेबांचं वर्चस्व जे काही प्रस्थापित होत होतं ते अनेकांना खटकत होतं. हे तेवढेच सत्य. त्यांच्या मागे कोण असेल हे कळेलच. जर दिघे साहेबांचा मृत्यू घडवला असेल, त्याच्या मागे कोणी ना कोणी असणार आहे. ज्याच्या हातून घडवला तो सांगेल कोणी सांगितलं होतं, असंही शिरसाट यांनी सांगितलं.

मनाला पटत नाही

आनंद दिघेंचं वर्चस्व बाळासाहेबांना खटकण्याचा काही प्रश्न येत नाही. बाळासाहेबांचे ते तर खासच होते. बाळासाहेबांकडे गेले आणि कोणते काम झालं नाही असं नाही. कोण होते त्याच्यामागे हा एक प्रश्न उपस्थित होतो. वयाच्या पन्नासाव्या वर्षी चांगला धडधाकट असलेला माणूस पायाला लागतं आणि अटॅक न जातो हे मनाला पटत नाही. आनंद दिघे जेव्हा जिल्हाप्रमुख होते, तेव्हा मी 17 वर्षे उपजिल्हा प्रमुख होतो. दहीहंडी असेल किंवा इतर कार्यक्रम असतील त्यामध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

काही तरी असू शकतं

केदार दिघे हा आता जन्मलेला माणूस आहे. या उबाठा गटाने त्याला उभा केला आहे. हे नाव सुद्धा आम्ही कधी ऐकलं नव्हतं. हे सो कोल्ड नातेवाईक आताचे काही तयार झाले आहेत. त्यांना दिघे साहेबांचं काही घेणं देणं नाही. दिघे साहेबांच्या मृत्यूच्या चौकशीची खरी मागणी त्यांनी करायला पाहिजे होती. त्यांच्याकडून हे वक्तव्य यायला पाहिजे होतं. माझ्यासारखा मागणी करतोय. मात्र जे नातेवाईक आहे ते गप्प बसले आहेत. याचं कारण काहीतरी असू शकतं, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

चित्रपटात वास्तव

चित्रपटात जे दाखवल ती वास्तविकता आहे. लोक आग लावत होते. कुणी सिलेंडर घेऊन फिरत होते, दिघे साहेबांचं काय? रुग्णालयात हजारो रुग्ण होते. काही लोकांनी अडवण्याचे काम केलं. दिघे साहेबांना बाहेर काढलं तर ते वाचतील, तिथं ढिगारा साचला असता. दिघे साहेबांना बाहेर काढायचं म्हणून प्रयत्न केले होते. एकनाथ शिंदे साहेबांसोबत अनेक लोक होते. फक्त शिंदे साहेब होते असं नाही. सत्यता नाकारून चालत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.