भाजप नेत्यांवरही ईडी, सीबीआयची छापेमारी व्हावी, मेघालयाचे राज्यपाल रोखठोक; भाजपला घरचा आहेर

ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची छापेमारी व्हावी असे भाजपमध्ये अनेक नेते आहेत. मात्र, असं होत नाही. केंद्र सरकारने भाजपच्या नेत्यांवर कारवाई केली पाहिजे. भाजप नेत्यांवर ईडी आणि सीबाआयच्या छापेमारीची गरज आहे.

भाजप नेत्यांवरही ईडी, सीबीआयची छापेमारी व्हावी, मेघालयाचे राज्यपाल रोखठोक; भाजपला घरचा आहेर
भाजप नेत्यांवरही ईडी, सीबीआयची छापेमारी व्हावी, मेघालयाचे राज्यपाल रोखठोक; भाजपला घरचा आहेरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 5:59 PM

रायपूर: मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) पुन्हा एकदा आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट उपराष्ट्रपतीपदाबाबत (Vice President) विधान केलं आहे. चूप राहण्याच्या बदल्यात मला केंद्र सरकारने उपराष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती. मात्र, मी त्यांना सांगितलं. मी असं करू शकत नाही. मला जे वाटतं ते मी जरूर बोलतो. त्यासाठी मला काहीही गमवावं लागलं तरी बेहत्तर. मात्र, जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतीपदाची निवड योग्यच होती, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. यावेळी सत्यपाल मलिक यांनी भाजप (bjp) नेत्यांवर ईडी, सीबीआयची छापेमारी करण्याची मागणी केली.

झुंझुनूं येथे आल्यावर मीडियाशी संवाद साधताना सत्यपाल मलिक बोलत होते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक गोष्टीचा सपोर्ट करतो. सोबतच मी माझं मतही व्यक्त करत असतो. म्हणजे मी मोदी सरकारच्या विरोधात आहे, असा त्याचा अर्थ नाही, असं सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं.

कर्तव्य पथवर टीका

केंद्र सरकारने इंडिया गेट पासून ते राष्ट्रपती भवनच्या मार्गाचं राजपथ नाव बदलून कर्तव्य पथ ठेवलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर त्यांनी टीका केली. दिल्लीतील राजपथाचं नाव बदलण्याची गरज नव्हती. राजपथ हे नावच अत्यंत चांगलं होतं. सर्वांना हे नाव माहीत होतं. पण बदलण्यात आलं. नवं नाव एखाद्या मंत्रासारखं वाटतं, अशी टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी चांगलं काम करताहेत

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची स्तुती केली. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या पक्षासाठी चांगलं काम करत आहेत. ते तरुण नेते आहेत. कोणताच नेता असं काम करत नाही, जे राहुल गांधी आज करत आहेत. ते अत्यंत चांगलं काम करत आहेत, अशी स्तुती सुमने त्यांनी उधळली.

भाजप नेत्यांवर ईडी-सीबीआयची छापेमारी व्हावी

देशात ईडी आणि सीबीआयची छापेमारी सुरू आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची छापेमारी व्हावी असे भाजपमध्ये अनेक नेते आहेत. मात्र, असं होत नाही. केंद्र सरकारने भाजपच्या नेत्यांवर कारवाई केली पाहिजे. भाजप नेत्यांवर ईडी आणि सीबाआयच्या छापेमारीची गरज आहे. ते होत नाही, त्यामुळेच देशात छापेमारीवरून वेगळं वातावरण तयार झालं आहे, असं बिनधास्त मतही त्यांनी व्यक्त केलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.