AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू संघटना म्हणतात, अफझल खानाची कबर हटवा, शंभुराज देसाई यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, कबरीला धक्का…

प्रतागडाच्या पायथ्याशी असणारी कबरच काढा, अशी मागणी हिंदू महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने कबर काढली नाही तर हिंदू महासंघ ही कबर हटवेल.

हिंदू संघटना म्हणतात, अफझल खानाची कबर हटवा, शंभुराज देसाई यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, कबरीला धक्का...
हिंदू संघटना म्हणतात, अफझल खानाची कबर हटवा, शंभुराज देसाई यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, कबरीला धक्का...Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2022 | 12:21 PM
Share

पुणे: सातारा येथील अफझल खानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदू संघटनांनी अफझल खानाची कबरच हटवण्याची मागणी केली आहे. हिंदू संघटनांची ही मागणी मंत्री शंभुराज देसाई यांनी फेटाळून लावली आहे. अफझल खानाच्या कबरीला धक्का पोहोचू देणार नाही, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदू संघटनांची ही मागणी फेटाळून लावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. कबर सोडून इतर बांधकाम तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण काढण्याचं काम सुरू केलं आहे. मूळ कबरीला धक्का पोहोचलेला नाही. धक्का पोहोचू देणार नाही, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.

अफझल खानाच्या कबर परिसरात 19 अनधिकृत खोल्या आहेत. ही सर्व अनधिकृत बांधकामं तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. न्यायालयीन निर्णयामुळे महाबळेश्वरला प्रताप गडाच्या पायथ्याशी अफझल खानाची कबर आहे. या कबरीचा ढाचा, त्याच्या बाजूच्या भिंती आणि छत याला हात लावलेला नाही.

पण त्या परिसरातील वऱ्हांडे आणि बांधकाम अनधिकृत आहेत. ते हटवा असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम सातारा जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, हिंदू संघटनांनी अफझल खानाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. ज्याने आमच्या मंदिरांची विटंबना केली. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले अशा अफझल खानाच्या थडग्याभोवतीचं बांधकाम शिंदे-फडणवीस सरकारने हटवलं.

शिवप्रताप दिनी शिंदे-फडणवीस सरकारने प्रताप दाखवला, असं भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. त्यांनी या कारवाईबाबत शिंदे सरकारचं आभारही मानले आहेत.

प्रतागडाच्या पायथ्याशी असणारी कबरच काढा, अशी मागणी हिंदू महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने कबर काढली नाही तर हिंदू महासंघ ही कबर हटवेल, असा इशाराही हिंदू महासंघाने दिला आहे.

अफझलखान आणि औरंगजेबाच्या कबरी महाराष्ट्रात नको. सगळ्यांना इतिहास माहिती झाला आहे. त्यामुळे आता कबर काढा, अशी मागणीही महासंघाने केली आहे. तसेच संध्याकाळी पुण्यात होणाऱ्या दीपोत्सव कार्यक्रमात अफजलखान वधाचे बॅनर लावले जाणार आहेत. पोलिसांनी आम्हाला बॅनर लावण्यास विरोध केला आहे, अशी माहिती आनंद दवे यांनी दिली आहे.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.