ही घराणेशाही नाही… अजित पवारांचे कुटुंब वेगळे, शरद पवारांचे कुटुंब वेगळे, रोहित पवारांचा तर्क
ajit pawar and sharad pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अजितदादांपेक्षा प्रफुल्ल पटेल यांचे फोटो दिसतात. म्हणजेच राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार यांच्यापेक्षा पटेल यांची पकड मजबूत आहे. पटेल यांचे गुजरातमार्गे मोदींशी काही संबंध असतील, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला.
बारामतीमधील पवार कुटुंबात तीन खासदार आणि एक उपमुख्यमंत्री आहे. त्यानंतर एक आमदार आहे. एकाच कुटुंबात पाच जणांना पदे दिली गेली आहे. त्यामुळे पवार कुटुंबियावर घराणेशाहीची टीका होत आहे. त्या टीकेवर उत्तर आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. ही घराणेशाही नाही. कारण शरद पवार यांचे कुटूंब वेगळे आहे. अजित पवार यांचे कुटुंब वेगळे आहे. शरद पवार यांनी २०१४ पर्यंत काँग्रेसच्या सत्तेत सुप्रिया सुळे याना खासदार केले नाही. त्यांना प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली होती. परंतु अजित पवार यांच्या आपल्याच पक्षातील लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी घरातच पुन्हा खासदारकी दिली, असा हल्ला रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर चढवला.
काय म्हणाले रोहित पवार
पवार कुटुंबात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना पदे मिळाली आहे. त्यावर टीका होत आहे. त्याबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर मलाही पद नव्हते. सुप्रिया सुळे यांना दीर्घकाळ पद दिले नव्हते. परंतु अजित पवार यांचा दुसऱ्यांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी घरात खासदारीक दिली. आता त्यांच्या पक्षातील नेते कुजबुज करत आहेत.
त्या लोकांना पक्षात घेणार नाही
अजित पवार यांच्या पक्षात अनेक गोष्टी सामान्य नाहीत. त्यांच्या पक्षातील अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशन होऊ दे, फंड मिळू दे, त्यानंतर अनेक आमदार निर्णय घेतील. आमच्याकडे येण्याची अनेकांची तयारी आहे. त्यातील ज्या लोकांनी खालच्या पातळीवर टीका केली नसेल आणि जे विरोधात फार बोलले नसतील त्यांच्याबाबत आम्ही विचार करु. इतरांना आमच्या पक्षात घेणार नाही. कोणाला पक्षात घ्यायच याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे रोहित पवार म्हणाले.
आम्हाला ८५ जागा द्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अजितदादांपेक्षा प्रफुल्ल पटेल यांचे फोटो दिसतात. म्हणजेच राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार यांच्यापेक्षा पटेल यांची पकड मजबूत आहे. पटेल यांचे गुजरातमार्गे मोदींशी काही संबंध असतील, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला. लोकसभेत राष्ट्रवादीने मोठ मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या. आता विधानसभेत मविआत राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात. आमचे ८५ आमदार निवडून आणायचे आहे. जागावाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, असे रोहित पवार म्हणाले.