सत्ता गेल्याची निराशा स्वस्थ बसू देत नसल्यानेच प्रत्येक गोष्टीत राजकारण; शरद पवारांचा भाजपवर घणाघात

सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळेच प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जात आहे, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे. (sharad pawar criticized bjp over politics in maharashtra)

सत्ता गेल्याची निराशा स्वस्थ बसू देत नसल्यानेच प्रत्येक गोष्टीत राजकारण; शरद पवारांचा भाजपवर घणाघात
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 7:32 PM

मुंबई: मंदिर उघडण्याबाबत करण्यात आलेल्या राजकारणावर मी काही भाष्य केलं नाही. एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं, असा सल्ला देतानाच पण ठिक आहे सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळेच प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जातं, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे. (sharad pawar criticized bjp over politics in maharashtra)

भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार काम करत आहे. या सरकारला सर्वसामान्यांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जनतेचा हा पाठिंबा पाहून काही लोकांना नैराश्य आलं आहे. त्या नैराश्यातूनच हे लोक राजकारण करत आहेत. आपल्याला सत्ता मिळाली नाही याचा संताप आणि अस्वस्थता हे लोक या माध्यमातून व्यक्त करत आहेत, अशी टीका पवारांनी केली. सत्ता गेल्यानंतर त्रास होतो हे मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी विरोधक काही शब्द वापरत आहेत. त्याला गांभीर्याने घेऊ नये, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. फडणवीस यांनी राज्य सरकारला बेईमान सरकार म्हटलं होतं. त्यावर पवारांनी पलटवार केला.

त्यांची सत्ता गेली याची ही अस्वस्थता आहे. माणसाने आशा ठेवावी. त्यांनी मागेही मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन, असे सांगितले होते आणि काल परवा असंच काहीसं सांगितले आहे. ठिक आहे त्याच्याकडे लोक बारकाईने लक्ष देतात, अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल, असेही ते म्हणाले.

सत्तेचा गैरवापर करण्याची पद्धत सुरू

आपल्या विचारांचे जे लोक नाहीत. त्यांच्या विरोधात सत्तेचा गैरवापर करण्याची पद्धत सुरू झाली आहे. यापेक्षा वेगळं काही नाही, अशा शब्दात पवार यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर भाष्य केलं.

चंद्रकांत पाटलांना चिमटा

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत पवारांना पत्रकारांनी छेडले. त्यावर ज्यांना महाराष्ट्र जरा गंभीरपणे घेतो अशांबाबत प्रश्न विचारा. काहीही काय विचारता?, अशा शब्दात पवारांनी चंद्रकांतदादांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. (sharad pawar criticized bjp over politics in maharashtra)

संबंधित बातम्या:

अजित पवारांसोबत पुन्हा शपथ घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

रावसाहेब दानवे ज्योतिष शास्त्राचे जाणकार?, उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण माहीत नव्हता; शरद पवारांचा टोला

‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय’, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

(sharad pawar criticized bjp over politics in maharashtra)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.