अनंत गीते म्हणजे संसदेतले ‘मौनी सभासद’ : शरद पवार
गुहागर (रत्नागिरी) : शिवसेनेचे रायगडचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्यावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. अनंत गीते म्हणजे संसदेतलं मौनी सभासद, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुहागर येथे जाहीर सभेत केली. रायगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी शरद […]
गुहागर (रत्नागिरी) : शिवसेनेचे रायगडचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्यावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. अनंत गीते म्हणजे संसदेतलं मौनी सभासद, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुहागर येथे जाहीर सभेत केली. रायगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार रत्नागिरीत आले होते.
“अनंत गीतेना तुम्ही सहावेळा निवडून दिलेत. मी गेली अनेक वर्षे संसदेत आहे. मात्र मी संसदेत अशी एक व्यक्ती पाहिली की खासदार म्हणून त्यांनी कोकणच्या, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर तोंड उघडलं नाही. तसेच आता सत्तेची ताकद असताना सुद्धा काही केलं नाही.” अशी सडकून टीका शरद पवार यांनी अनंत गीतेंवर केली.
सुनील तटकरे यांनीही यावेळी शिवसेनेवर जोरदार शाब्दिक प्रहार केला. “गुहागरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंसह एकाही नेता विकासावर बोलला नाही. त्यांनी फक्त ‘सुनील तटकरे’ लक्ष्य केलं. माझ्याबाबतीत त्या ठिकाणी बोलता, होय माझ्या विरुद्ध चौकशी सुरु आहे. पाच वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप झाले. पण एकही आरोप सिद्ध झाला नाही.”, असा घणाघात सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर केला.
तसेच, “तुम्ही स्वतःचं अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर बोलता. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हा तुमचा धंदा आता कोकणवासीय पुढच्या काळात सहन करणार नाहीत.”, अशी टीकाही सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर केली.
दरम्यान, अनंत गीते यांनी कुणबी समाजासाठी काहीच केलं नाही. नुसती आश्वासनं दिली. आपण खासदार झाल्यावर चारही तालुक्यांमध्ये कुणबी भवन उभारु, असं आश्वासन यावेळी तटकरे यांनी दिलं.