शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन, इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा; बैठक लांबणार?

शरद पवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा झाली नाही. पावसामुळे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठका स्थगित करण्यात आल्या आहेत.

शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन, इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा; बैठक लांबणार?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 9:22 AM

मुंबई | 29 जुलै 2023 : पाटणा आणि बंगळुरूनंतर आता इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, ही बैठक लांबण्याची शक्यता आहे. काँग्रेसने ही बैठक सप्टेंबरमध्ये घेण्याची विनंती केली आहे, त्यामुळे ही बैठक कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीची चर्चा करण्यासाठी काँग्रेसचं एक शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटलं. यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकीवर चर्चा करण्यात आली. ही बैठक सुरू असतानाच शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बैठकीबाबत चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. विरोधी पक्षातील जवळपास 100 नेते या बैठकीला येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. बंगळुरूच्या बैठकीला 26 पक्षांचे नेते होते. मुंबईतील बैठकीतील हा आकडा वाढू शकतो, असंही सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. ही बैठक 15 ऑगस्टनंतर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. आम्ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ही बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही बैठक घेण्याची आम्ही विनंती केली आहे. मात्र, अजून तारीख निश्चित झालेली नाही, असं नाना पटोले म्हणाले.

मुंबईतील बैठकीचं विशेष महत्त्व

मुंबईत होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे. इंडिया आघाडीची पहिल्यांदाच मुंबईत बैठक होत आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यात विरोधकांची सत्ता नाही, त्या राज्यात होणारी ही पहिली बैठक आहे. या आधी बिहारच्या पाटण्यात ही बैठक झाली होती. तिथे नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांची सत्ता आहे. दोघेही नेते इंडिया आघाडीत आहे.

दुसरी बैठक कर्नाटकाच्या बंगळुरूमध्ये झाली. तिथे काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे सत्ता नसलेल्या राज्यात इंडिया आघाडीची पहिल्यांदाच बैठक होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीने या बैठकीचं आयोजन केलं आहे.

उद्धव ठाकरेंना फोन

शुक्रवारी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. ही बैठक सुरू असताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावला. त्यांच्याशी इंडिया आघाडीच्या बैठकीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आधीच्या दोन बैठकांचा अनुभव सांगून बैठकीच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केलं. मुंबईतील विरोधकांच्या बैठकीला 100 नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तिकीट वाटपाची चर्चा नाही

दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा झाली नाही. पावसामुळे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठका स्थगित करण्यात आल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर या बैठका पुन्हा सुरू होतील. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या राज्यभरात संयुक्त सभा होणार आहेत. या बैठकीत तिकीट वाटपाची चर्चा झाली नाही.

आम्ही आधीच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चार पाच बैठका घेतल्या होत्या. आता तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करू. यावेळी जागा वाटप आणि उमेदवारांची निवड यावर चर्चा होईल, असं नाना पटोले म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.