शरद पवारांनी घेतली शशिकांत शिंदेंची भेट; जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालांवर बंद दाराआड चर्चा
सातारा जिल्हा बँकेचे निकाल नुकतेच लागले या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची भेट घेतली.
सातारा : जिल्हा बँकेचे निकाल नुकतेच लागले या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहामध्ये खासदार श्रीनिवास पाटील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
पराभवाचा वचवा काढणार
या चर्चेनंतर आमदार शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याचे ते म्हणाले. याबरोबरच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सातारा आणि जावळी या ठिकाणी लक्ष केंद्रीत करणार असून, सातारा नगरपालिकेची निवडणूक एक हाती जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
शशिकांत शिंदेंचा निसटता पराभव
दरम्यान जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून, त्यांनी विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव केला.
संबंधित बातम्या
34 वर्षांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये, नागपूर विधानपरिषदेसाठी बावनकुळेंविरोधात छोटू भोयर
MLC election : काँग्रेसकडून विधान परिषदेच्या ‘या’ दोन जागांसाठी उमेदवार जाहीर