ठाकरे पवारांची 22 दिवसात दुसरी भेट, राऊतांचे ‘नरेंद्रभाई’, मविआत कशाची घाई? वाचा सविस्तर

पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये गेल्या 22 दिवसांनंतर ही दुसरी भेट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटायला गेले होते. त्याअगोदर 7 जूनला पवार आणि ठाकरेंची वर्षावर 1 तास चर्चा झाली.

ठाकरे पवारांची 22 दिवसात दुसरी भेट, राऊतांचे 'नरेंद्रभाई', मविआत कशाची घाई? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 11:05 PM

मुंबई : राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. एकीकडे अनिल देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलाय. तर दुसरीकडे शरद पवारच नाराज असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर पवार थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये गेल्या 22 दिवसांनंतर ही दुसरी भेट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटायला गेले होते. त्याअगोदर 7 जूनला पवार आणि ठाकरेंची वर्षावर 1 तास चर्चा झाली. मात्र पुन्हा राजकीय वर्तुळात शिवसेना ही भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याचं कारण होतं उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची विशेष भेट. या बातम्यानंतर ऑपरेशन गुप्त कमळच्या बातम्या आल्या. आणि त्यानंतर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला. (Sharad Pawar meets Uddhav Thackeray second time major incidents happening in Maharashtra politics)

22 दिवसात दुसरी भेट

याच दरम्यान पवारही नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. याच बातम्यांमागे कारण होतं. शनिवारी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास झालेली चर्चा, सोमवारी पुन्हा राऊत उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा झाली. याच चर्चेनंतर राऊतांनी पवारांना मुख्यमंत्र्यांचा निरोप पोहोचवला. या घडामोडी कशासाठी घडल्या ? त्याचं उत्तर मंगळवारी मिळालंय. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले…आणि 22 दिवसांनी या दोन बड्या नेत्यांमध्ये बैठक झाली…स्पष्ट आहे ज्या तऱ्हेने राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पवारांना भेटले. त्यावरुन ही बैठक घडवून आणली ती राऊतांनीच…संजय राऊतांनीच मध्यस्थीची भूमिका निभावल्याची चर्चा आहे. आता राऊतांना मध्यस्थीची भूमिका का निभवावी लागली, त्या मागंही गेल्या काही दिवसात झालेल्या भेटीगाठी आहेत.

का आहे मविआत अस्वस्थता?

1. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पवारांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याची चर्चा होती. शाहांनी या भेटीवर अधिक बोलणं टाळलं पण मीडियावर भेट नाकारली नाही

2. काही दिवसांआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली

3. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचं बोललं जात होतं

4. या भेटीगाठीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत शंकेचं वातावरण निर्माण झालं होतं आणि पवार-उद्धव ठाकरेमधल्या भेटीगाठीही थांबल्या होत्या

5. तसंच महाविकास आघाडीतल्या कुरबूरीवरुनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती

6. त्याचबरोबर मविआतल्या नेत्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.

7. अनिल देशमुखांना ईडीकडून समन्सही गेलेत, त्यावरुनही चर्चा झाल्याची माहिती आहे.

ठाकरेंचे नरेंद्रभाई

या सर्व घडामोडींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट घडवण्याचं काम राऊतांनी केल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे ही भेट होण्याच्या काही तास आधीच मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असंही राऊतांनी म्हटलं होतं. पण मोदी हे अजूनही ठाकरेंसाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

नानांचं स्वबळ

पवार आणि उद्धव ठाकरेंच्या या भेटीत महाविकास आघाडीतील कुरबूर आणि काँग्रेसच्या नाना पटोलेंची स्वबळाची भाषा, यावरुनही चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतंय. तर राऊतांनीही 3 पक्षांच्या सरकारमधील मतभेद म्हणजे नाराजी नाही, असं म्हटलंय.

‘अग्रेसर’ राऊत

महाविकास आघाडी घडवण्यात संजय राऊतच अग्रेसर होते. भाजपशी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन खटकल्यानंतर राऊतांनी पवारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाचा वाटा उचललाय. पवार जर नाराज झाले तर महाविकास आघाडीसाठी ते परवडणार नाही. त्यामुळं पुन्हा एकदा राऊतांनी पुढाकार घेऊन पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये मध्यस्थी केल्याचं दिसतंय..

पडद्यामागं काय चाललंय याचा थांग राजकीय पंडितांना येत नाही

पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागं काय चाललंय याचा थांग राजकीय पंडितांना येत नाही. विशेष म्हणजे राऊत पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना का भेटले याचं उत्तर अनेकांकडे नव्हतं. नंतर ते पवारांना का भेटले, तेव्हाही सरकारमधल्याच अनेकांना त्याचा थांगपत्ता लागला नाही. मात्र या दोन मोठ्या घडामोडीनंतर पवार-ठाकरे भेट ही सर्वात मोठी घडामोड आहे. या भेटीनंतर सरकारमध्ये सारंकाही आलबेल आहे की पडद्यामागं आणखी काही घडतंय, हे येत्या काही दिवसांत दिसेल…

इतर बातम्या :

आमदार अंबादास दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार

पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा?

(Sharad Pawar meets Uddhav Thackeray second time major incidents happening in Maharashtra politics)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.