Sharad Pawar : सरकार पडलं तर तुम्ही भाजपासोबत जाणार का? पवारांनी पत्रकाराचा सेन्स काढला
महाविकास आघाडी सरकारवर आलेल्या संकटाबाबत अद्याप उद्धव ठाकरेंशी काहीही बोलणं झालेलं नाही. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ' उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पक्षातील बंडखोरी कशी दूर करायची, हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. माझी अडीच वाजता मिटिंग आहे. त्यानंतर मी मुंबईला जाणार आहे.
नवी दिल्लीः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील हालचाली अत्यंत वेगानं सुरु आहेत. अशा वेळी सरकार पडलं तर काय काय होऊ शकतं, त्याच्या शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. अर्थातच राज्य आणि राष्ट्रीय राजकारणाचा (Maharashtra politics) तगडा अनुभव असलेल्या शरद पवारांनाही (Sharad Pawar) याबाबत प्रश्न विचारण्यात आले. शिवसेनेतील जवळपास 35 आमदारांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड पुकारल्याची चर्चा आहे. अनेक आमदारांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे शिवसेनेचं सरकारमधलं संख्याबळ कमी होऊ शकतं. तसंच भाजपदेखील सरकार इतर पक्षांच्या मदतीनं सरकार स्थापनेचा दावा करू शकतं. यावर शरद पवार यांना एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर शऱद पवारांची अत्यंत बोलकी प्रतिक्रिया उमटली.
पत्रकाराच्या प्रश्नावर पवार काय म्हणाले?
दिल्लीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील स्थितीवर त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. महाविकास आघाडी सरकार पडलं तर तुम्ही भाजपसोबत सत्तेत बसणार का? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी पत्रकाराच्या सेन्सवरच प्रश्नचिन्हं उभं केलं. काहीतरी सेस्निबल प्रश्न विचारत जात.. असं पवार म्हणाले. एकवेळ आम्ही विरोधात बसू पण भाजपसोबत नाही, अशी प्रतिक्रिया शऱद पवार यांनी दिली.
बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर आलेल्या संकटाबाबत अद्याप उद्धव ठाकरेंशी काहीही बोलणं झालेलं नाही. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. दुपारी ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर त्यांच्याशी आम्ही बोलू. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पक्षातील बंडखोरी कशी दूर करायची, हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. माझी अडीच वाजता मिटिंग आहे. त्यानंतर मी मुंबईला जाणार आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. ते कुठे आहेत हे सुद्धा मला माहीत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिघे सोबत आहे. पण एक्झॅटली काय मुद्दा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिवसेनेकडून कळवलं जात नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही