नाथाभाऊ काय चीज आहे हे महाराष्ट्राला दाखवून देऊ; शरद पवार यांचा सूचक इशारा

नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही, असं सांगतानाच एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाही, असे गौरोद्गार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काढले.

नाथाभाऊ काय चीज आहे हे महाराष्ट्राला दाखवून देऊ; शरद पवार यांचा सूचक इशारा
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 4:52 PM

मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असे गौरोद्गार काढतानाच नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. (sharad pawar  on eknath khadse’s party joining)

एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना पक्ष प्रवेश दिल्यानंतर केलेल्या स्वागतपर भाषणात पवार यांनी हे भाष्य केलं. खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचं काम नाथाभाऊंनी केलं. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगरपरिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे, असं पवार म्हणाले.

नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेव्हा शब्द देतात तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत, असं पवार म्हणाले.

अजितदादा नाराजीत तथ्य नाही

अजितदादा पवार नाराज असल्याच्या चर्चा मीडियाने चालवल्या. त्यात काही तथ्य नाही. कोरोनामुळे सहकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. अजितला ताप होता. त्यामुळे ते काळजी घेत आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, असं सांगतानाच जितेंद्र आव्हाडही व्हेंटिलेटरवर असतानाही नाराजीच्या बातम्याही मीडियाने चालवल्या, असं पवार म्हणाले. (sharad pawar  on eknath khadse’s party joining)

संबंधित बातम्या:

दिल्लीतल्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही, तुम्ही राष्ट्रवादीत जा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे यांच्यासह 72 नेते राष्ट्रवादीत, कोणाकोणाचा पक्षप्रवेश?

Eknath Khadse | त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

(sharad pawar  on eknath khadse’s party joining)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.