पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा पुतळा, सुप्रिया सुळेंकडून शिल्पकाराचं कौतुक

सुप्रिया शिंदे या महिला शिल्पकाराचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी शरद पवार यांचा 9 फुटाचा मेटलचा पुतळा बनवला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याची पाहणी केली. पुण्यातील आंबेगाव परिसरात पवारांचा 9 फुटाचा पुतळा साकारला आहे.

पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा पुतळा, सुप्रिया सुळेंकडून शिल्पकाराचं कौतुक
शरद पवार यांचा मेटलचा पुतळा, सुप्रिया सुळेंकडून पाहणी
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 4:28 PM

पुणे : पुण्यातील महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पुतळा साकारला आहे. सुप्रिया शिंदे या महिला शिल्पकाराचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी शरद पवार यांचा 9 फुटाचा मेटलचा पुतळा बनवला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याची पाहणी केली. पुण्यातील आंबेगाव परिसरात पवारांचा 9 फुटाचा पुतळा साकारला आहे. तसंच सुप्रिया शिंदे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी यांचाही मेटलचा पुतळा बनवला आहे. (Sculptor Supriya Shinde made a metal statue of NCP President Sharad Pawar in Pune)

शरद पवार यांचा मेटलचा पुतळा बनवला जात आहे. त्यासाठी दीड टन मेटलचा वापर करण्यात आलाय. पवारांचा हा पुतळा साकारण्यासाठी तब्बल 8 महिन्याचा कालावधी लागला. रोज 10 तास काम करुन हा पुतळा साकारल्याचं शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी पवारांच्या पुतळ्याची पाहणी केली आणि शिल्पकार सुप्रिया शिंदे यांचं कौतुक केलं. सुप्रिया शिंदे यांना आतापर्यंत 3 पुरस्कार मिळाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पवारांचा पुतळा बनवण्याचा निर्णय घेतला होता. इंटरनेटवर पवारांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून हा पुतळा साकारल्याचं शिंदे म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळेंकडून कौतुक

पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी शिल्पकार सुप्रिया शिंदेचं कौतुक केलंय.

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी सुप्रिया सुळेंची मागणी

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मदत व्हावी या हेतूने महिला व बालकल्याण विभागानं तालुकास्तरावर वात्सल्य समित्या स्थापन करण्याची घोषणा केली. परंतु अनेक ठिकाणी या समित्या अस्तित्वात आल्या नसल्यानं संबंधित महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समित्यांमुळे कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांना मोठा आधार मिळणार आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आपणास नम्र विनंती आहे की,कृपया जेथे या समित्या नाहीत तेथे त्या स्थापन करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून केलीय.

इतर बातम्या : 

अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

भाजपाच्या आरक्षण विरोधी धोरणामुळे झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, नाना पटोलेंचा घणाघात

Sculptor Supriya Shinde made a metal statue of NCP President Sharad Pawar in Pune

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.