डी. वाय पाटलांच्या ‘राष्ट्रवादी’प्रवेशावर शरद पवारांनी अखेर मौन सोडलं!

कोल्हापूर : बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या 23 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. कित्येक दशकं काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून राहिलेल्या डॉ. डी. वाय. पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे अनेकांना धक्का बसला होता. शिवाय, मुलगा सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक असलेल्या धनंजय […]

डी. वाय पाटलांच्या 'राष्ट्रवादी'प्रवेशावर शरद पवारांनी अखेर मौन सोडलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

कोल्हापूर : बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या 23 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. कित्येक दशकं काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून राहिलेल्या डॉ. डी. वाय. पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे अनेकांना धक्का बसला होता. शिवाय, मुलगा सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक असलेल्या धनंजय महाडिक यांच्याच पक्षात वडिलांनी प्रवेश केल्याने घरात आणि कोल्हापूरच्या राजकारणातही मोठा हादरा मानला जात होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कुठलीच प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर दस्तुरखुद्द शरद पवार यांनी या प्रकरणावर अखेर मौन सोडलं आहे.

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर भाष्य केले. शरद पवार म्हणाले, “डॉ. डी. वाय. पाटील गेल्या वर्षभरापासून पक्षात (राष्ट्रवादी काँग्रेस) येण्यासंदर्भात मागे लागले होते. डॉ. डी. वाय. यांचं पक्षाला मार्गदर्शन लाभणार आहे.”

वाचा : डी. वाय. पाटील…. बस्स, नामही काफी है!

एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अर्थात दस्तुरखुद्द शरद पवारांनीच आता डॉ. डी. वाय. पाटील यांचे जाहीर स्वागत केले आहे. नुसते स्वागत नव्हे, तर डॉ. डी. वाय. पाटील यांचे पक्षाला मार्गदर्शन लाभेल, असेही म्हटले आहे.

कोण आहेत डी. वाय. पाटील?

डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचे शिक्षण, आरोग्य क्षेत्रात भरीव काम आहे. केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले आहे. डॉ. डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.

डी. वाय. पाटील हे 2009 ते 2013 या काळात त्रिपुरा, तर 2013 ते 2014 या काळात बिहराचे राज्यपाल होते. शिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही काही काळ कार्यभार होता.

1957 ते 1962 या काळात ते काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. 1967 आणि 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.

डी. वाय पाटील यांच्या शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील संस्था (सौजन्य विकिपीडिया) :

  • डी वाय पाटील विद्यानगरी
  • डॉ डी वाय पाटील एज्युकेशनल एंटरप्रायजेस चॅरिटेबल ट्रस्ट
  • डॉ डी वाय पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (इंटिग्रेटेड कँपस), चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे
  • डॉक्टर डी वाय पाटील नॉलेज सिटी, चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे

शाळा

  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, वरळी, मुंबई
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नागपूर
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, पुणे
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, अँटवर्प, बेल्जियम

महाविद्यालये

  • डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे .
  • डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील आयुर्वे्द महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटीचे महिला मेडिकल कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील होमिओपॅथिक कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेरुळ, नवी मुंबई
  • डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज दंत महाविद्यालय, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कसबा बावडा-कोल्हापूर

विद्यापीठे

  • पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर

हॉस्पिटल

  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर

क्रीडा संस्था

  • डी.वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ-नवी मुंबई
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.