Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : फडणवीसांनी वेगवेगळ्या मार्गांनी माणसं आपलीशी केली, शरद पवारांना फडणवीसांचा ‘चमत्कार’ मान्य

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : ही निवडणूक सोपी नव्हती. राजकारणात रिस्क घ्यावी लागते. ती रिस्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली. शिवसेनेने सहावी सीट लढवली. सहाव्या सीट निवडून आणण्याच्या मतांमध्ये मोठा गॅप होता. आमच्याकडे सहाव्या मतांसाठीची संख्या कमी होती.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : फडणवीसांनी वेगवेगळ्या मार्गांनी माणसं आपलीशी केली, शरद पवारांना फडणवीसांचा 'चमत्कार' मान्य
फडणवीसांनी वेगवेगळ्या मार्गांनी माणसं आपलीशी केली, शरद पवारांना फडणवीसांचा 'चमत्कार' मान्यImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 9:19 AM

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) निकालावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतानाच त्यांना टोलेही लगावले. तर शिवसेनेच्या धाडसाचंही कौतुक केलं. तसेच मला धक्का बसवा असा हा निकाल नाही, असं सांगतानाच राज्य सरकार स्थिर आहे. आघाडीचं एकही मत फुटलेलं नाही. आघाडीची (maha vikas aghadi) मते स्थिर आहेत. जी मते फुटली ती अपक्षांची आहेत, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच प्रफुल्ल पटेल यांना मिळालेलं एक अतिरिक्त मत आघाडीचं नव्हतं. ते भाजपच्या अपक्षांचं मत होतं. मला सांगूनच या अपक्षाने मतदान केलं होतं, असंही पवार म्हणाले. सहाव्या जागेसाठी आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. भाजपकडे ही संख्या अधिक होती. शिवाय आमच्याकडचे अपक्ष आमदार वेगवेगळ्या मार्गाने आपलीशी करण्यात फडणवीसांना यश आलं. त्यांचा हा चमत्कार मान्य करावाच लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण केलं. ही निवडणूक सोपी नव्हती. राजकारणात रिस्क घ्यावी लागते. ती रिस्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली. शिवसेनेने सहावी सीट लढवली. सहाव्या सीट निवडून आणण्याच्या मतांमध्ये मोठा गॅप होता. आमच्याकडे सहाव्या मतांसाठीची संख्या कमी होती. तरीही आम्ही धाडस केलं. प्रयत्न केला. सहाव्या सीटसाठी भाजपकडे संख्या अधिक होती. तरीही आघाडी आणि भाजपकडे विजयासाठीची मते पुरेशी नव्हती. पण आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना आपल्याकडे वळवण्यात आले. फडणवीसांनी वेगवेगळ्या मार्गांनी ही माणसं आपलीशी केली. त्यामुळे हा फरक पडला. एकंदर जो चमत्कार झाला आणि विविध मार्गाने माणसं आपल्या बाजूने करण्यात फडणवीसांना यश आलं हे मला मान्य केलं पाहिजे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

आमचा कोटा ठरलेला होता

या निकालाने मला धक्का बसलेला नाही. आमच्या आघाडीचा कोटा ठरलेला होता. त्यात काही फरक पडलेला नाही. उलट भाजपचं एक मत आम्हाला अधिक पडलं. भाजप समर्थित अपक्ष आमदाराने आम्हाला हे एक अतिरिक्त मत दिलं. मला सांगून हे मत देण्यात आलं, असंही पवारांनी सांगितलं.

गंमती जमती झाल्या

आमच्या कोऑर्डिनेशनमध्ये काही फरक पडला नाही. एकदोन मते इकडे तिकडे झाली. ज्यादा घेतली. पण ती दोन नंबरची होती. त्यांना ज्यादा मिळाली. पण काँग्रेस सेना, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकाही मताला धक्का बसला नाही. भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही. राहिला अपक्षांचा भाग. तर त्यात गंमती झाल्या आहेत, असंही ते म्हणाले.

त्यांनी सांगून मत दिलं

प्रफुल्ल पटेल यांना एक अतिरिक्त मत मिळालं. पण ते एक्स्ट्रा मत शिवसेनेला जाणारं नव्हतं. ते एक्स्ट्रा मत विरोधकाच्या कोट्यातलं होतं. त्यांनी मला सांगून दिलं. तिथे अनेक लोक आहेत. त्यांनी कधीकाळी माझ्यासोबत काम केलंय. मी जर एखादा शब्द टाकला तर त्यांची नाही म्हणायची तयारी नसते. पण मी त्यात पडलो नाही. एकाने स्वत:हून मला सांगितलं. ते मत भाजपचं नव्हतं. भाजप सोबत असलेल्या अपक्षाचं मत फुटलं, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.