विसरु नका, उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर शरद पवारांचा हात, त्यामुळेच ते मुख्यमंत्री, अमोल कोल्हेंची ‘सिधी बात’

पुणे-नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाद सुरु आहे. हा वाद थांबण्याची चिन्हं नाहीत.

विसरु नका, उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर शरद पवारांचा हात, त्यामुळेच ते मुख्यमंत्री, अमोल कोल्हेंची 'सिधी बात'
शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 4:05 PM

पुणे : मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांचा आशीर्वाद आहे, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांना दिला. अमोल कोल्हेंच्या या ‘सिधी बात’ मुळे शिरुरमधील (Shirur Lok sabha) वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हं आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन (khed ghat bypass) अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाद सुरु आहे. हा वाद थांबण्याची चिन्हं नाहीत. हा वाद एवढा शिगेला पोहचलाय की मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असं वक्तव्य कोल्हे यांनी केलं. त्यामुळे आता या दोघांमधला वाद सरकारवर परिणाम करतो का याची चर्चा सुरू झाली आहे.

नेमका वाद काय?

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे कालच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्‌घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

या माध्यमातून खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुरघोडी केली आहे

आढळरावांचा दावा काय?

खेड घाट बायपासच्या कामाच्या श्रेयाची चोरी करुन वचनपूर्ती करण्याचं थोतांड केल्याचा आरोप, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला. इतकंच नाही तर त्यांनी शिवसैनिकांसमवेत उद्घाटन करत बाह्यवळण मार्ग प्रवाशांसाठी खुला केला.

खेड घाटातील बायपासचे काम बंद पडले होते. त्यावेळी आपण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज अखेर बाह्यवळणाचे काम झालं आहे. अशा वेळी अचानक उद्घाटन करण्याचा घाट खासदार कोल्हे यांनी घातला. या कामासाठी कुठलेच योगदान नसताना त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत, असा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

पाहा VIDEO 

संबंधित बातम्या  

Sharad Pawar Meet PM Modi | ही भेट नॉर्मल, तरी काही घडलं असेल तर माहिती नाही : चंद्रकांत पाटील

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.