पहाटेच्या शपथविधीवर दादांचा गौप्यस्फोट ! अमित शाहांसोबत-शरद पवारांची बैठक नंतर फिरले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, शरद पवार आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाली होती. पण नंतर शरद पवारांनी शब्द फिरवला. यावर शरद पवार यांनी देखील त्यांना उत्तर दिले आहे.

पहाटेच्या शपथविधीवर दादांचा गौप्यस्फोट ! अमित शाहांसोबत-शरद पवारांची बैठक नंतर फिरले
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 9:17 PM

Ajit Pawar : अजित पवार पहिल्यांदाच पहाटेच्या शपथविधीवरुन बोलले आहेत. एका उद्योगपतीच्या घरी अमित शाहांसोबत शरद पवारांची बैठक झाली. भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याचं ठरलं आणि शरद पवार पलटले असा थेट आरोप अजित पवारांनी केला आहे. 2019 मधल्या पहाटेच्या शपथविधीवरुन, अजित पवारांनी पहिल्यांच शरद पवारांचं नाव घेतलं. एका उद्योगपतीच्या घरी, अमित शाहांसोबत शरद पवारांच्या 5-6 बैठका झाल्या. त्या बैठकीत मी, फडणवीस आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होतो. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची हे ठरलं आणि मुंबईत आल्यावर शरद पवार फिरवल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. त्यानंतर अमित शाहांनी फोन करुन शब्द पाळावं लागेल, असं सांगितल्यानं आपण फडणवीसांसोबत शपथ घेतल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

पवारांनी फेटाळले आरोप

शरद पवार यांनी अजित पवारांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मला माहिती नाही असं सांगून आमची भाजपसोबत जाण्यासाठी संमती नव्हती असं शरद पवार म्हणाले आहेत. आता जे अजित पवार बारामतीच्या सभेत शुक्रवारी बोललेत. तेच स्वत: फडणवीस TV9च्या कॉनक्लेव्हमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीत बोलले होते.

शब्द पाळण्यासाठी शपथ घेतली – अजित पवार

अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन भाजप आणि शिवसेना युतीत फूट पडली. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली होती. त्याच काळात अमित शाहांसोबतच शरद पवारांच्या बैठका झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं. म्हणजेच भाजपला शरद पवारांनी दिलेला शब्द फिरवला. मात्र आपण शब्द पाळण्यासाठी फडणवीसांसोबत शपथ घेतल्याचं अजित पवार सांगत आहेत.

पहाटेच्या शपथविधीवरुन गूढ कायम

पहाटेच्या शपथविधीवरुन आतापर्यंत गूढच आहे. ते गूढ उकलण्याचं काम फडणवीसांनी TV9च्या कॉनक्लेव्हपासून सुरु केलं. आता थेट अजित पवारांनी शरद पवारांचं नाव घेतलं. पहाटेच्या शपथविधीच्या घटनेला, आता साडे 4 वर्ष होत आलीत. 6 महिन्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका येतील. पण आतापर्यंत पहाटेच्या शपथविधीआधी पडद्याआड काय काय घडलं हे समोर येणं सुरुच आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.