AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनियांचाही शब्द डावलणारे ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण?; रणपिसेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

विधानपरिषदेसाठी सोनिया गांधी यांनी माझं नावही फायनल केलं होतं. पण तत्कालीन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला डावलून इतर उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी केला. (sharad ranpise expose maharashtra's ex congress president over ticket distribution)

सोनियांचाही शब्द डावलणारे ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण?; रणपिसेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ
शरद रणपिसे, ज्येष्ठ काँग्रेस नेते
| Updated on: Dec 14, 2020 | 4:42 PM
Share

मुंबई: दिवंगत नेते राम प्रधान यांनी मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे शब्द टाकला होता. विधानपरिषदेसाठी सोनिया गांधी यांनी माझं नावही फायनल केलं होतं. पण तत्कालीन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला डावलून इतर उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. (sharad ranpise expose maharashtra’s ex congress president over ticket distribution)

बिहार व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आणि माजी आमदार राम प्रधान यांना आज विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शोक प्रस्तावावर बोलताना शरद रणपिसे यांनी हा गौप्यस्फोट केला. राम प्रधान यांनी मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून सोनिया गांधींकडे शब्द टाकला होता. सोनिया गांधींनीही मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. शरद रणपिसेंसारखा उमेदवार आपल्याकडे नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पण मी मुंबईत येण्याच्या तीन दिवस आधीच तत्कालीन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला डावलून इतरांना उमेदवारी दिली, असा गौप्यस्फोट रणपिसे यांनी केला. सोनिया गांधींनी आपलं तिकिट फायनल केलेलं असतानाही या प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला एबी फॉर्म दिला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी सभागृहात काँग्रेस नेते अशोक चव्हाणही बसलेले होते. त्यांच्यासमोरच रणपिसे यांनी हा गौप्यस्फोट केला. मात्र, त्यावेळी अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष नव्हते, अशी पुस्तीही रणपिसे यांनी जोडली. यावेळी रणपिसे यांनी या माजी प्रदेशाध्यक्षाचं नाव घेतलं नाही. त्यामुळे काँग्रेसचे हे माजी प्रदेशाध्यक्ष कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, नेता, संसदपटू आणि व्यक्ती म्हणून राम प्रधान यांच्या व्यक्तिमत्त्वाचा रणपिसे यांनी आढावा घेतला. तसेच प्रधान यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजळा देतानाच त्यांच्या कार्यावरही त्यांनी भाष्य केलं. प्रधान हे मितभाषी आणि अभ्यासू नेते होते. सर्वांना सामावून घेण्याचं त्यांचं कौशल्या वाखाणण्यासारखं होतं, असंही ते म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही प्रधान यांच्या आठवणी जागवल्या. आजच्या घडीला प्रधान यांच्या सारख्या नेत्याची गरज असल्याचं अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक प्रस्तावावर भाषण करताना सांगितलं.

माणिकराव ठाकरेंनी डावलले?

शरद रणपिसे यांनी विधानपरिषदेची उमेदवारी नाकारली तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण होते? याबाबत चर्चा रंगली आहे. अशोक चव्हाणांनी रणपिसेंना डावलले की माणिकराव ठाकरेंनी डावलले याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण त्याआधीच रणपिसे यांनी चव्हाण प्रदेशाध्यक्ष नव्हते असं सांगितलं आहे. तर, त्यावेळी माणिकराव ठाकरे हेच प्रदेशाध्यक्ष होते, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांना माणिकराव ठाकरे यांनीच डावलल्याचं बोललं जात आहे. रणपिसे यांना आमच्या प्रतिनिधीने त्या प्रदेशाध्यक्षाचं नाव विचारलं असता त्यांनी स्मितहास्य करत त्यावर बोलण्यास नकार दिला. (sharad ranpise expose maharashtra’s ex congress president over ticket distribution)

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश

‘ईडी’च्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी झाली: प्रताप सरनाईक

हिवाळी अधिवेशन LIVE | फडणवीसांचा हल्लाबोल, पडळकरांचे ढोल बजाओ

(sharad ranpise expose maharashtra’s ex congress president over ticket distribution)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.