Shiv Sena : शिवसेनेवर दावा करण्यासाठी शिंदे गटाची गुपचूप मोहीम, यवतमाळमध्ये सेना पदाधिकाऱ्यांकडून घेतली प्रतिज्ञापत्रं

Shiv Sena : राज्यात सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही गटाकडून आपापल्या समर्थकांचे मेळावे बैठका घेतल्या जात आहेत. शक्तिप्रदर्शन केले जात आहे. याच दरम्यान शिवसेनेने बंडाळीची व्याप्ती पाहून सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे.

Shiv Sena : शिवसेनेवर दावा करण्यासाठी शिंदे गटाची गुपचूप मोहीम, यवतमाळमध्ये सेना पदाधिकाऱ्यांकडून घेतली प्रतिज्ञापत्रं
एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 7:37 PM

यवतमाळ: शिवसेनेत (shivsena) मोठी फूट पडल्यानंतर शिंदे गटाने शिवसेने हक्क सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या आदेशानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेला समर्थन असल्याचं प्रतिज्ञापत्रं लिहून घेण्यात आलं. शिवसेनेची ही मोहीम सुरू असतानाच आता शिंदे गटानेही गुपचूप गुपचूप शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रं लिहून घेतली जात आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय राठोड (sanjay rathod) यांच्या देखरेखी खाली यवतमाळमध्ये ही प्रतिज्ञापत्रं भरून घेतली जात आहेत. अशा प्रकारचे कोणतेही प्रतिज्ञापत्रं भरून घेतली जात नसल्याचं शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पण पदाधिकारी मात्र आमच्याकडून प्रतिज्ञापत्रं लिहून घेतल्याचं सांगत आहे. त्यामुळे शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे.

राज्यात सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही गटाकडून आपापल्या समर्थकांचे मेळावे बैठका घेतल्या जात आहेत. शक्तिप्रदर्शन केले जात आहे. याच दरम्यान शिवसेनेने बंडाळीची व्याप्ती पाहून सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. राज्यभरातील शिवसैनिकांकडून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ते शिवसेनेतच असल्याचं प्रतिज्ञापत्रं भरून घेतलं जात आहे. शिवसेनेच्या या हालचाली सुरू असतानाच आता शिंदे गटाकडून सुद्धा अशाच पद्धतीने साध्या कागदावर समर्थन पत्र लिहून घेतले जात आहे.

हे सुद्धा वाचा

राठोडांच्या कार्यालयात मोहीम

आज यवतमाळमध्ये शिंदे समर्थकांची बैठक पार पडली. आमदार संजय राठोड यांच्या कार्यलयात ही बैठक पार पडली. शिंदे गटाचे नेते ठाण्यातील नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी पक्ष संघटनेचा आढावा घेतला आणि समर्थन पत्र भरून घेतले. याबाबत संजय राठोड गटातील समर्थक गजानन बेजांकिवार यांनी कुठलेही समर्थन पत्र भरून घेतले नसल्याचा दावा केला. या बैठकी नंतर आलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला असता आपल्याकडून समर्थन पत्र भरून घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांना पाठिंबा द्यायला आलो असून त्यांना तसं समर्थन पत्र दिल्याचं या शिवसैनिकांनी सांगितलं.

आपलीच बाजू भक्कम

शिवसेना आणि शिंदे गट सेना हे दोघेही या समर्थन पत्राद्वारे आपली बाजू भक्कम कशी हे दाखविणार आहेत. राज्यभर असे पत्र या दोन्ही गटाकडून भरून घेतले जात आहे. त्यामुळे आगामी काळात हे समर्थन आणि पाठिंबा पत्र यावर काय होते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

शिवसेनेत पडझड सुरूच

दरम्यान, शिवसेनेतील पडझड सुरूच आहे. आज बदलापूरमधील सर्वच्या सर्व 25 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. नवी मुंबईतील 33, मीरा भाईंदरच्या 12, उल्हासनगरमधील 15, अंबरनाथमधील 20 आणि मुंबईतील एका नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि अंबरनाथमधील नगरसेवक शिंदे गटात आल्याने शिंदे गट अधिक पॉवर फुल झाला आहे. तर हिंगोली आणि यवतामाळमधील नगरसेवक, पंचायत, जिल्हापरिषद आणि नगरपरिषद सदस्यही शिंदे गटात सामील झाले आहेत. औरंगाबाद, यवतमाळ, हिंगोलीसह राज्यातील इतर भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.