Nana Patole : शिंदे सरकार वर्षभरात कोसळेल; नाना पटोले म्हणतात, तेव्हा त्यांचं डोकं ठिकाण्यावर येईल

Nana Patole : मुख्यमंत्र्याच्या 200 आमदारांच्या चॅलेंजवर चर्चा करायला आता वेळ नाही. ते मुख्यमंत्री झालेत. गोडधाड करुन पुढचा काळ बघू.

Nana Patole : शिंदे सरकार वर्षभरात कोसळेल; नाना पटोले म्हणतात, तेव्हा त्यांचं डोकं ठिकाण्यावर येईल
शिंदे सरकार वर्षभरात कोसळेल, तेव्हा त्यांचं डोकं ठिकाण्यावर येईल; नाना पटोलेंची टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 10:53 AM

सोलापूर: एकनाथ शिंदे (eknath shinde)  मुख्यमंत्री होऊन आठ दिवस झाले नाही तोच शिंदे सरकार लवकर पडणार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी सर्वात आधी सहा महिन्यात हे सरकार कोसळणार असून राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यापासून ते थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शिंदे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे. पवारांनी डिसेंबरपर्यंत मध्यावधी निवडणुका होतील असं सांगितलं. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहा महिन्यात नाही, पण वर्षभरात शिंदे सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे सरकार कधी कोसळणार याबाबत आघाडीतच संभ्रम असल्याचं दिसत आहे.

नाना पटोले सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्याच्या 200 आमदारांच्या चॅलेंजवर चर्चा करायला आता वेळ नाही. ते मुख्यमंत्री झालेत. गोडधाड करुन पुढचा काळ बघू. मुख्यमंत्र्याना थोडे दिवस पुढे जाऊ द्या. जेव्हा त्यांना भाजपची हवा कळेल तेव्हा त्यांच डोकं ठिकाण्यावर येईल. माईक ओढणे ही तर अजुन सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यासाठीही तर सुरुवात झाली, असं नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा अधिकार नाही

महाराष्ट्रात राजकिय भूकंप घडवण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले. मात्र महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली. अग्निपथ सारखी चुकीची योजना आणून देशातील तरुणांच्या सुरक्षिततेला धोका पोहचवण्याचे काम केंद्र सरकारने केले. हे सगळे दाबण्यासाठी सत्तांतर घडवले. महान परंपरेच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा अधिकार 50 आमदारांना दिलेला नाही. बंड केलेल्या आमदारांचा विषय शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर अधिक बोलणं योग्य नाही. बंड केलेल्या आमदारांना जनता जनार्दनच उत्तर देईल, असं ते म्हणाले.

ओबीसी आरक्षण नसेल तर निवडणुका नको

ओबीसी आरक्षण घेऊनच निवडणुका व्हायला हव्यात. ओबीसी आरक्षण नसेल तर निवडणुका घेऊ नयेत. राज्यात अपुरा पाऊस, दुबार पेरणी, शेतकरी नुकसान ही उभे संकटे असताना या कडे लक्ष द्यायला हवे. निवडणुका आल्यावर पाहता येईल, असंही ते म्हणाले.

शिवसैनिकांकडून सत्कार

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल नाना पटोलेंचे शिवसैनिकांनी आभार मानून विशेष सत्कार केला. शिवसेनेच्या आमदारांनी दगा जरी दिला तरी काँग्रेस खंबीरपणे उभी राहिली. यामुळे कुडूवाडीतील शिवसैनिकांनी भगवी शाल देऊन नाना पटोले यांचा विशेष सन्मान केला. तरुण शिवसैनिक नाना पटोलेला मानणारे आहेत. काँग्रेसचा शिवसैनिक त्यांना दिसतोय. त्यामुळे हे तरुण शिवसैनिक महाराष्ट्र भर मला मानणारे आहेत.माझे फॉलोअर्स आहेत. ही सगळी माणसं आमचीच आहेत, असं पटोले यावेळी म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.