AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज्य सरकारने निर्णय घेतल्याशिवाय वीजबिल भरु नका’, कल्याणचे शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रेंचं आवाहन

भाजप, मनसेनंतर आता सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही वीज ग्राहकांना वाढीव वीजबिल भरु नका, असं आवाहन करण्यात येत आहे. (shiv sena corporator appeal people to not pay electricity bill).

'राज्य सरकारने निर्णय घेतल्याशिवाय वीजबिल भरु नका', कल्याणचे शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रेंचं आवाहन
| Updated on: Nov 28, 2020 | 8:47 PM
Share

ठाणे : भाजप, मनसेनंतर आता सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही वीज ग्राहकांना वाढीव वीजबिल भरु नका, असं आवाहन करण्यात येत आहे. भाजप सत्तेवर असताना वीज दरात वाढ करण्याची परवानगी भाजपनेच दिली होती. पण आता तेच भाजप वाढीव वीजबिल विरोधात ओरडत आहे, असा हल्लाबोल युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी केला (shiv sena corporator appeal people to not pay electricity bill).

वाढीव वीजबिलविरोधात भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपकडून राज्यभरात वाढीव विजबिलाची होळी करण्यात आली. तसेच मनसेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. वाढीव वीज बिल भरु नका, असं आवाहन नागरीकांना दोन्ही पक्ष करीत आहेत. त्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने देखील वाढीव वीजबिल भरु नका, असं आवाहन नागरीकांना केले आहे.

जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही. तोपर्यंत नागरिकांनी वीज बिल भरु नये, असं आवाहन शिवसेना नगरसेवक आणि युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी केलं आहे. दरम्यान, दीपेश यांनी भाजपवर निशाणा साधला (shiv sena corporator appeal people to not pay electricity bill).

“2019 मध्ये जेव्हा भाजप सत्तेत होती तेव्हा वीज वितरण कंपनीला वीज दर वाढविण्याची कॅबीनेटमध्ये मंजुरी दिली होती. दर वाढीचा तो निर्णयच एप्रिल 2020 पासून लागू झाला आहे. तो पूढील तीन वर्षांकरीता राहणार आहे. भाजपने दर वाढविले. पण आता तेच ओरडत आहेत”, असा घणाघात दीपेश म्हात्रे यांनी केला.

हेही वाचा : गर्भवती महिलेला रुग्णालयातून बाहेर काढल्याचा वाद, शिवसेना नगरसेवकाने माघार घेत माफी मागितली, डॉक्टरांचा संप मागे

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.