ब्रेकिंग! शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यासंदर्भात आजची सुनावणी उद्यावर, शिवसेना नवी याचिका दाखल करणार?

Shiv sena Dussehra Melava Hight Court Latest News : शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासंदर्भात उद्या (शुक्रवारी) दुपारी सुनावणी पार पडेल. सोबत शिवसेना सुधारित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. सुधारीत याचिकेत नेमकं काय?

ब्रेकिंग! शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यासंदर्भात आजची सुनावणी उद्यावर, शिवसेना नवी याचिका दाखल करणार?
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 12:47 PM

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, मुंबई : शिवाजी पार्कवर (Shivaji Park, Dussehra Melava) दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी कुणाला मिळणार, यावर आज मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) सुनावणी पार पडणार होती. पण ही सुनावणी आजऐवजी आता उद्यावर ढकलली गेली आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासंदर्भात उद्या (शुक्रवारी) दुपारी सुनावणी पार पडेल. सोबत शिवसेना (Shiv Sena News) सुधारित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यानंतर हायकोर्टात पार पडणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

बुधवारी शिवसेनेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करत शिवसेनेच्या वतीने कोर्टात दाद मागितली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र ही सुनावणी आज ऐवजी आता उद्यावर ढकलली गेलीय. शिवाय शिवसेनेच्या वतीने आता सुधारीत याचिका दाखल केली जाण्याची शक्यताय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, शिंदे गटाच्या वतीने आमदार सदा सरवणकर यांनीदेखील हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी सदा सरवणकर यांनी केलेली होती. दरवर्षी सदा सरवणकर हेच शिवसेनेच्या वतीने परवानगीसाठी पालिकेला अर्ज करत होते. मात्र यंदा झालेल्या बंडखोरीनंतर आता सदा सरवणकर यांनी ‘आपणच खरी शिवसेना आहोत, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी’, अशी मागणी केलीय.

सत्ता संघर्षानंतर आता शिवाजी पार्कसाठीही शिवसेनेला कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. त्याआधी मुंबई महानगर पालिकेनं बचावात्मक भूमिका घेतली होती. कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव कुणालाही परवानगी देता येणार नाही, असं पत्र दोघांनी पाठवलं आहे. 1966 सालापासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कच्या मैदानावरच घेण्यात येतो. मात्र शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाकडून कुणाला हिरवा कंदील मिळणार, हे शुक्रवारी (23 सप्टेंबर) स्पष्ट होणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.