Live | आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत, पण वाटेला जाल तर…, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात इशारा
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी 50 जणांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडत आहे (Shiv Sena Dussehra Melava Live Update).
मुंबई : “सरकार स्थापन व्हायला एक वर्ष होत आलं. तरीही विरोधक तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्या. मी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेकजण सरकार पडेल, असं स्वप्न बघत आहेत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत. पण जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत”, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी 50 जणांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोना संकटामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित झाली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सायंकाळी सातच्या मुहुर्तावर हा मेळावा सुरु झाला होता (Shiv Sena Dussehra Melava Live Update).
LIVE UPDATE:
-
बिहारच्या जनतेने प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावं, कोणाला करावं हे मी सांगणार नाही, फक्त डोळे उघडे ठेवून मतदान करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/nJxpeiVuDU
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही 808 एकर जंगल वाचवलं, एक नवा पैसाही खर्च न करता कारशेड उभारतोय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/exhWLTiAS5
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत- मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/kOaYk0rdKc
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
#Breaking : आमच्या अंगावरती येत आहात,महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध राहा : उद्धव ठाकरे#शिवसेना दसरा मेळावा Live TV: https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/ZDaMdEDI0q
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
इथं काम करणारी पोरं महाराष्ट्राच्या मातीतली हवी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/PzSSJcs004
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणारा रावण आलाय, मुंबईत यायचं आणि इथल्या मातेशी नमकहरामी करायची, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर मुख्यमंत्र्यांचा प्रहार https://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/16EAFVe6jM
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, आमचे जीएसटीचे पैसे मिळायलाच हवेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/gDvZsgTL5J
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
बिहारमध्ये मोफत लस, मग आम्ही काय बांगलादेशचे?? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/LntHCpyaTd
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
देश संकटात आहे आणि भाजप राजकारण करतंय, हा देश म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/GceQQijCSH
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी, जीएसटी फेस गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/5tMjKmnwz8
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
- <
कोरोना आहे, संकट आहे, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून, जीएसटीची प्रणाली फसली असेल तर पंतप्रधानांनी आपली चूक मान्य करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/gqOAYafiHI
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
/li>
-
सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषणं व्यवस्थित आलं पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/maB9dB5q4r
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #Shivsena pic.twitter.com/6OOScaAdch
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/MyGhUlvbs0
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला, वाघ पाहून तो लपला, मुख्यमंत्र्यांची राणे पिता पुत्रांवर जोरदार टीका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #ShivSena pic.twitter.com/1XKH3lK8uq
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
#Breaking : महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाराला आडवा करुन गुढीपाडवा उभारण्याची महाराष्ट्राची परंपरा: उद्धव ठाकरे #शिवसेना दसरा मेळावा Live TV: https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/Kay7tcvhvm
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
- सरकार स्थापन व्हायला एक वर्ष होत आलं. तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्या. मी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेकजण सरकार पडेल, असं स्वप्न बघत आहेत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुडाच्या ढेपाला चिटकणारे मुगळे नाहीत. पण जर वाटेल जाल तर मुगळा कसा डसतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत : उद्धव ठाकरे
- महाविजयादशनी निमित्त दसऱ्याच्या शुभेच्छा.. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा : उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु
-
#Breaking : 11 कोटी जनतेचे आशीर्वाद या सरकारच्या मागे आहेत. ठाकरे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार : संजय राऊत#शिवसेना दसरा मेळावा Live TV: https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/ICDE6bt94j
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
कुणी कितीही चिखलफेक केली तरी आमचं सरकार पाच वर्ष टिकणार, जनतेच्या मनात आम्ही आत्मविश्वास निर्माण केला, महाराष्ट्राचे आशीर्वाद सरकारच्या पाठीशी- संजय राऊतhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #Shivsena pic.twitter.com/TW4c31QREp
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
#Breaking : महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना, वादळ आणि इतर संकटाला तोंड देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डगमगले नाहीत. चिखलफेक झाली तरी ते राज्याचा कारभार करत आहेत. मराठी माणसाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला: संजय राऊत#शिवसेना दसरा मेळावा Live TV: https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/W1c1SPmKPj
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने राज्याचा गाडा हाकला त्याची नोंद इतिहासात नक्की होईल- संजय राऊतhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #Shivsena pic.twitter.com/G30tSSaxB7
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
/li>
-
हिंदुत्वाचे धडे आम्हाला कुणी देण्याची गरज नाही, आमचा हिंदुत्वाचा वारसा स्वातंत्र्यवीर सावकरांचा- संजय राऊतhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #Shivsena pic.twitter.com/2ZDkyiEmB9
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
#Breaking : शिवसेनाप्रमुखांनी संघर्ष करण्याचा मार्ग दाखवला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणजे महाराष्ट्रातील 11 कोटी जनता मुख्यमंत्री झाली असं समजतो: संजय राऊत#शिवसेना दसरा मेळावा Live TV: https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/8Ggo8K0zMu
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात मी सांगितलं होतं की पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, सेना प्रमुखांनी आम्हाला रस्ता दाखवला. त्यातून मला आत्मविश्वास, आपण मुख्यमंत्री झालात म्हणजे महाराष्ट्रातील 11 कोटी जनता मुख्यमंत्री – राऊत#UddhavThackeray https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/Q5yuhiiweJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
खासदार संजय राऊत यांच्याकडून कार्यक्रमाचं प्रस्ताविक सगळं काही सुरळित असतं तर सगळ्या जगाने नोंद घेतली असती, हा महाविजय दसरा मेळावा गेल्या वर्षी याच दिवसामध्ये विजयाला प्रारंभ झाला, महाराष्ट्रात आपण असत्यावर विजय मिळवला- संजय राऊतhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray pic.twitter.com/FVnV6VbIWL
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
-
LIVE : कोरोना संकट नसतं तर हा मेळावा अबूतपूर्व असता, हा वाईटावर चांगल्याचा विजय, गेल्यावर्षी युद्धाला प्रारंभ झाला आणि आपण महाराष्ट्र राज्यात असत्यावर विजय मिळवला : संजय राऊत https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/FtKrIDgDsL
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
- संजय राऊत यांच्या भाषणाला सुरुवात
- शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने दसरा मेळाव्याला सुरुवात
-
दसरा मेळाव्याला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने सुरुवातhttps://t.co/ImprYhMJl7#UddhavThackeray #CMUddhavThackeray #Shivsena pic.twitter.com/ZxRDC17DNq
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
- मुख्यमंत्री सावरकर स्मारकारत पोहोचले, त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील सावरकर स्मारकारत दाखल
- मुख्यमंत्र्यांचा ताफा शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन
- उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन रवाना, थोड्याच वेळात बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला अभिवादन करणार
- बाळासाहेब ठाकरे स्मारकावर शिवसैनिकांची गर्दी
- सावरकर स्मारकात शिवसेनेचे नेते पोहोचायला सुरुवात
- महापौर किशोरी पेडणेकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक झाल्या. त्यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दोन्ही भूमिकेत दिसणार. मुख्यमंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर आणि जनतेलाही मार्गदर्शन करतील, असा विश्वास किशोरी यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा 2020 LIVE @ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT @AUThackeray #दसरा_मेळावा https://t.co/euIzGUHuOc
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
दसरा मेळाव्यातील ताजी दृश्ये
दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. दसरा मेळाव्यात छायाचित्रणासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी सुरु असलेल्या तयारीचे फोटो समोर आले आहेत (Shiv Sena Dussehra Melava Live Update).
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास सहपरिवार शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील. त्यानंतर ठीक 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातून त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याला संबोधित करतील. तसेच, शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना मेळाव्याला प्रमुख उपस्थिती
शिवसेना सचिव – अनिल देसाई, विनायक राउत, आदेश बांधेकर, मिलिंद नार्वेकर, सुरज चव्हाण
युवासेना मुंबईचे पदाधिकारी – अमोल किर्तीकर आणि वरुण सरदेसाई
लोकसभा खासदार – अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे
राज्यसभा खासदार – प्रियंका चतुर्वेगी
विधानसभेचे आमदार – प्रकाश सुर्वे, सुनिल राऊत, रमेश कोरगांवकर, रविद्रं वायकर, सुनिल प्रभु, रमेश लटके, दिलीप लांडे, प्रकाश फातर्फेकर, मंगेश कुडाळकर, संजय पोतनीस, सदा सरवणकर, अजय चौधरी, यामिनी जाधव
विधानपरिषद आमदार – अनिल परब, विलास पोतनीस, मनिषा कायंदे, मंत्री नीलम गोर्हे
मुंबईच्या महापौर – किशोरी पेडणेकर
जनसंपर्कप्रमुख – हर्षल प्रधान