Arjun Khotkar : अर्जुन खोतकरांचा आज शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’?; थोड्याच वेळात घोषणा करणार

Arjun Khotkar : कालही खोतकर दिल्लीत होते. अर्जुन खोतकर हे द्विधा मनस्थितीत असल्याचं कळल्यानंतर अब्दुल सत्तार हे दिल्लीत आले. माजी मंत्री सुरेश नवले आणि सत्तार यांनी खोतकर यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे तिन्ही नेते श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावर गेले.

Arjun Khotkar : अर्जुन खोतकरांचा आज शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'?; थोड्याच वेळात घोषणा करणार
अर्जुन खोतकरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 7:41 AM

जालना: गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेले शिवसेनेचे मराठवाड्यातील मोठे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आज शिवसेनेला (shiv sena) सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. गेल्या पाच दिवसांपासून अर्जुन खोतकर दिल्लीत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर काल शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी त्यांची मनधरणी केली. नंतर सत्तार, नवले आणि खोतकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन ब्रेकफास्टही केला. यावेळी नवले आणि सत्तार यांनी खोतकर हे 31 जुलै रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आज खोतकर पत्रकार परिषद घेणार असल्याने या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अर्जुन खोतकर यांच्या घर आणि कार्यालयावर काही महिन्यांपूर्वी ईडीची धाड पडली होती. तेव्हापासून ते अस्वस्थ आहेत. परवा दिल्लीत आल्यावर त्यांनी आपण आणि आपले कुटुंबीय तणावाखाली असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर दिल्लीतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी खोतकर आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यात दिलजमाई घडवून आणली होती. त्यानंतर दानवे यांनीही खोतकर आणि आम्ही एकत्र काम करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंना विचारून निर्णय घेणार

कालही खोतकर दिल्लीत होते. अर्जुन खोतकर हे द्विधा मनस्थितीत असल्याचं कळल्यानंतर अब्दुल सत्तार हे दिल्लीत आले. माजी मंत्री सुरेश नवले आणि सत्तार यांनी खोतकर यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे तिन्ही नेते श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावर गेले. तिथे शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे हे सुद्धा उपस्थित होते. या नेत्यांनीही खोतकर यांचं मन वळवलं. त्यानंतर मीडियाशी प्रतिक्रिया देताना नवले आणि सत्तार यांनी थेट खोतकर यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्तच सांगितला. विशेष म्हणजे खोतकर यांच्यासमोरच या नेत्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर खोतकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता मी जालन्यात गेल्यावर उद्या बोलेल. मी भूमिका जाहीर करेपर्यंत काहींना झोप लागणार नाही, असं खोतकर म्हणाले होते. तसेच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले होते.

लोकसभा लढवायची आहे

खोतकर यांनी फडणवीस आणि दानवे यांची भेट घेऊन आपल्याला लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली होती. मात्र, ही जागा भाजपची असल्याने ती सोडण्यास फडणवीस आणि दानवे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे खोतकर नाराज झाले आहेत. मात्र, खोतकर यांना वेगळी कमिटमेंट देण्यात आल्याचं सांगितलं जातं. शिवाय त्यांची शिंदे सरकारमध्ये वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे खोतकर यांच्या आजच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.