प्रियांका चतुर्वेदी ते ओमराजे निंबाळकर, संजय राऊतांच्या दिल्लीतील घरी खासदार एकवटले, अधिवेशनात शिवसेना धमाका करणार?

शिवसेना खासदारांची दिल्लीत 'लंच डिप्लोमसी' पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक होत असून, शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित आहेत.

प्रियांका चतुर्वेदी ते ओमराजे निंबाळकर, संजय राऊतांच्या दिल्लीतील घरी खासदार एकवटले, अधिवेशनात शिवसेना धमाका करणार?
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 2:26 PM

वी दिल्ली : एकीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना, दुसरीकडे शिवसेना खासदारांची दिल्लीत ‘लंच डिप्लोमसी’ पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक होत असून, शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षाची व्यूहरचना ठरवण्याबाबत या बैठकीत चर्चा होत आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. याशिवाय खासदार विनायक राऊत खासदार श्रीरंग बारणे, संजय मंडलिक, गजानन कीर्तिकर, हेमंत पाटील, अनिल देसाई, राजन विचारे, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर असे सेनेचे खासदार संजय राऊतांच्या घरी दाखल झाले.

या बैठकीपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. विनायक राऊत म्हणाले, “मराठा आरक्षणवर लोकसभेत चर्चा व्हावी यासाठी आम्ही स्थगन प्रस्ताव आणि नोटीस ऑफ अटेन्शन दिली आहे. त्याबाबत खुल्या चर्चेची मागणी केली आहे. आरक्षणासाठी 50 टक्केची मर्यादा ओलांडावी असा कायदा केंद्र सरकारने संसदेत मंजूर करावा, यासाठी शिवसेना प्रयत्न करेल”.

अशोक चव्हाण-संजय राऊत भेट

दरम्यान, या बैठकीपूर्वी आज सकाळीच काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. राऊतांच्या घरीच ही भेट झाली.

 मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कंबर कसली आहे. संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघावा म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत आले आहेत. त्यांनी काँग्रेससह शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत लावून धरण्याची विनंतीही त्यांनी या नेत्यांना केली आहे

संबंधित बातम्या  

VIDEO: अशोक चव्हाण एकटेच दिल्लीत, मराठा आरक्षणासाठी नेत्यांच्या भेटीगाठी

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.