Shiv Sena : भाजप सोबत युती करा, शिंदेंशी बोलून मार्ग काढा, खासदार गोडसेंचं मोठं विधान; उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय घडलं?

Shiv Sena : भाजपबरोबरची नैसर्गिक युती आगोदरची आहे. नाशिक लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. देवळाली आणि सिन्नरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेच्या विरोधात लढून जिंकून आले आहेत.

Shiv Sena : भाजप सोबत युती करा, शिंदेंशी बोलून मार्ग काढा, खासदार गोडसेंचं मोठं विधान; उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय घडलं?
भाजप सोबत युती करा, शिंदेंशी बोलून मार्ग काढा, खासदार गोडसेंचं मोठं विधानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 12:58 PM

नाशिक : भाजपसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी बंड केलं. त्यानंतर आघाडीशी काडीमोड घ्या आणि भाजपसोबत युती करा, असा प्रस्तावही या बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांकडे ठेवला. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यामुळे बंडखोरांनीच भाजपशी (bjp) हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता खासदारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत युती करण्याचा हेका उद्धव ठाकरेंसमोर धरला आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवर बैठक झाली. त्यात या खासदारांनी युतीचा आग्रह धरला. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणीही या खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे. शिवसेना खासदारांच्या या मागणीमुळे उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपबरोबरची नैसर्गिक युती आगोदरची आहे. नाशिक लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. देवळाली आणि सिन्नरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेच्या विरोधात लढून जिंकून आले आहेत. आघाडी झाली तर अडचणीचं ठरेल. शिवसेनेचा उमेदवार काय करेल? म्हणून नैसर्गिक युती करावी. अडीच वर्षाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचा कार्यकाळ आणि 25 वर्षाचा भाजपबरोबरचा अनुभव पाहता युती करायला हवी. आघाडीसोबतचे अनुभव चांगले नाहीत. त्यामुळे आघाडीसोबत राहायला नकोच, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. इतर खासादारांनीही ही मागणी केली आहे, असं गोडसे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

शिंदेंशी संवाद साधा

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधून मार्ग काढण्याचा आग्रहही उद्धव ठाकरेंकडे करण्यात आला आहे. आम्ही सर्वांनी विनंती केली आहे. ते विचार करतील अशी आशा आहे. ते सकारात्मक विचार करतील असं आम्हाला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.

उद्धवजी म्हणाले, विचार करू

या बैठकीत भाजपला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मदत करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे असं आम्ही सांगितलं. त्यावर विचार करू असं उद्धवजी म्हणाले, असंही त्यांना सांगितल्याचं गोडसे यांनी स्पष्ट केलं.

तर प्रकल्प मार्गी लागतील

केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. केंद्र आणि राज्य एकत्र नसल्याने प्रकल्प रखडले आहेत. युती झाल्यास हे प्रकल्प मार्गी लागतील. पर्यायाने राज्याचा विकास होईल, असंही ते म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.