एकीकडे गुप्त बैठकीची चर्चा, दुसरीकडे स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोलेंची मोठी प्रतिक्रिया

एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गुप्त बैठकीचं वृत्त समोर आल्यानंतर, तिकडे स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकीकडे गुप्त बैठकीची चर्चा, दुसरीकडे स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोलेंची मोठी प्रतिक्रिया
NCP Meeting_Nana Patole
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 8:18 PM

मुंबई : एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गुप्त बैठकीचं वृत्त समोर आल्यानंतर, तिकडे स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार वाचवायचा प्रश्नच नाही आम्ही तिघेही सोबत आहोत. सरकार पाच वर्ष चालेल”, असं नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Shiv Sena MP Sanjay Rauts secret meeting congress leader Nana Patole said, Government of Maharashtra will complete its term of five years )

सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं कळतंय. मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, सरकार वाचवण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही. हे सरकार पाच वर्ष चालणार आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत.

नितीन राऊत आणि माझ्यात भांडण लावण्याचा प्रयत्न 

दरम्यान, नाना पटोले यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या खात्यातील कथित घोटाळ्यावरही भाष्य केलं आहे. “मी कुठलेही पत्र ऊर्जाविभागाच्या विरोधात लिहिलेलं नाही. नागपूरच्या खणीकरण विकास महामंडळाने जे कोलवॉशिंगचे टेंडर काढले होते ते चुकीच्या पद्धतीने काढले होते. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, यामध्ये ऊर्जा विभागाचा काही संबध नाही. कॉंग्रेसमध्ये आपआपसात भांडणे आहे असे दाखवण्याचा प्रयत्न झाला तो काही बरोबर नाही. खणीकरण महामंडळाचा विषय ऊर्जा विभागाचा आहे असे दाखवून नितीन राऊत आणि माझ्यात भांडण लावण्याचा प्रयत्न झाला ते चुकीचा आहे”

साखर कारखान्यांवर ईडीची धाडी

सरकारने ईडी आणि सीबीआयला पोपट केले आहे. दुसऱ्या पक्षांना घाबरवण्यासाठी अशा तपास यंत्रणांना हाताशी धरुन कारवाया करणे घातक आहे. अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी करुन विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत काही गोंधळ घालता येईल का याची चाचपणी केली जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला.

संजय राऊतांच्या गुप्त बैठकीची चर्चा

महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं कळतंय. मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.

संबंधित बातम्या 

सरकार वाचवण्यासाठी हालचाली, संजय राऊत यांची गुप्त बैठक, कोण कोण उपस्थित?

शिवसेनेकडील खनिकर्म महामंडळाच्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.