55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर मग 40-45 ला महापौर का नाही? जे राज्यात केलं तेच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये करणार राऊत?

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या होम ग्राऊंडवर पुण्यात जाऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर मग 40-45 ला महापौर का नाही? जे राज्यात केलं तेच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये करणार राऊत?
संजय राऊत आणि अजित पवार
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 1:39 PM

पिंपरी-चिंचवड :  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या होम ग्राऊंडवर पुण्यात जाऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तसंच महाविकास आघाडी आहे. सगळ्यांना थोडं मिळालं पाहिजे. या न्यायाने पुणे आणि पिंपरीत सेनेचा महापौर झाला पाहिजे, अशी आमची इच्छा असेल तर चुकलं कुठे, असा सवालही त्यांनी विचारला.

पिंपरी चिंचवडमध्ये आज संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी करताना आगामी काळातली सेनेची राजकीय महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. त्यांनी अजित पवार यांच्या पुणे बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

55 आमदारांवर मुख्यमंत्री, मग 50 नगरसेवकांवर महापौर का नाही?

राऊत म्हणाले, महापालिकेचे कुणाचे कितीही आकडे आले तरी महापौर आपलाच होईल… मी असं म्हणत नाही की आम्ही शंभर जागा जिंकू… पण मी मागे म्हटल्याप्रमाणे 55 जागा आल्या तरी आमचा मुख्यमंत्री होतो तर चाळीस-पंचेचाळीसला किमान पिंपरी-चिंचवडचा महापौर झाला पाहिजे, आमची अत्यंत माफक अपेक्षा आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सेनेचा महापौर बसलाच पाहिजे

महाविकासआघाडी आहे सगळ्यांना थोडा थोडा वाटा मिळाला पाहिजे तर त्यात आम्हालाही मिळाला पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहराचा महापौर जर शिवसेनेचा असला पाहिजे, अशी जर आपण अपेक्षा केली तर त्यात चुकीचं काय? पुण्याच्या महापौर शिवसेनेचा असावा असं वाटतंय तर त्यात आपलं चुकलं काय?, असंही राऊत म्हणाले.

अजित पवार ऐकत नाहीत, मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत

पुणे जिल्ह्यात आपलं कोण ऐकत नाही असं काही जण सांगतात… मुख्यमंत्र्यांचे अजित पवार ऐकतात, त्यांना सांगू आमचे ही ऐका, नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत? मुख्यमंत्री हे दिल्लीचा अंदाज घ्याला गेलेत कारण दिल्ली वर  आपल्याला राज्य करायचं आहे, असंही संजय राऊत म्हणाले. आपल्याला कुठल्याही पक्षाने गृहित धरु नये, असा त्यांच्या बोलण्याचा एकंदरित रोख असावा, अशी चर्चा आहे.

इतक्या वर्षात दोन्ही शहरात सेनेचा महापौर झाला नाही, ही मोठी खंत

इतकी वर्षे आपण या महाराष्ट्राच्या राजकारणात आहोत. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यातला… सातत्याने बाळासाहेब पुण्यात यायचे.. अनेक सभा घ्यायचे… अनेक माणसं त्यांनी जोडली… अनेकांना राजकारणात आणलं… शिवसेनेची ओळख कामातून झालेली आहे… पण एक खंत आहे की की आपण पिंपरी आणि पुण्यावर कधी भगवा फडकवू शकलो नाही, असंही राऊत म्हणाले.

यावेळी जय्यत तयारी करा!

मागील वेळेस 4 च्या प्रभागाचा फटका आपल्याला बसला ,तसं त्यांना का नाही बसला?, असा सवाल विचारताना आपल्याला फटका बसला याचा अर्थ आपलं संघटन कमी पडले. पण मंचावर बसलेल्या लोकांनी एक एक नगरसेवक जरी निवडून आणला तरी पिंपरीच सेनेचा महापौर होईल, असंही राऊत सांगायला विसरले नाहीत.

हे ही वाचा :

‘पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे’, संजय राऊतांनी बालेकिल्ल्यात जाऊन अजितदादांना डिवचलं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.