Eknath Shinde : शिंदे विरुद्ध ठाकरे लिगल फाईट आता कोर्टात, ‘या’ चार मुद्द्यांवर शिंदे गटाचा जोर

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाच्या वकिलाने चार मुद्द्यावर आम्ही जोर देणार असल्याचं सांगितलं आहे. आम्हीच शिवसेनेचा मूळगट आहोत. त्यामुळे आम्हाला मान्यता देण्यात यावी. आमच्या 16 आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत.

Eknath Shinde : शिंदे विरुद्ध ठाकरे लिगल फाईट आता कोर्टात, 'या' चार मुद्द्यांवर शिंदे गटाचा जोर
शिंदे विरुद्ध ठाकरे लिगल फाईट आता कोर्टात, 'या' चार मुद्द्यांवर शिंदे गटाचा जोर Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 11:01 AM

मुंबई: आधी अर्जव, विनवण्या, आवाहनं, नंतर आरोपप्रत्यारोप, त्यानंतर टीका, टिप्पणी आणि हल्लाबोल, त्यानंतर रस्तावरून उतरून हंगामा आणि तोडफोड… शिवसेना (shiv sena) आणि शिंदे गटातील हे चित्रं गेल्या आठवड्याभरापासून पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातूनही प्रश्न सुटत नसल्याने आता हा प्रश्न थेट कोर्टात गेला आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. शिंदे गटाने कोर्टात दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यात चार मुद्द्यांकडे कोर्टाचं लक्ष वेधलं आहे. कोर्टात आज या दोन्ही याचिकांवर सुनावणी होणार आहे. दिग्गज वकील यावेळी युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोर्टाकडून आज येणारा निर्णय हा ऐतिहासिक असाच ठरणार आहे. कारण या निकालावरच भविष्यात बंड करू शकणाऱ्यांचं भवितव्य ठरणार आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या वकिलाने चार मुद्द्यावर आम्ही जोर देणार असल्याचं सांगितलं आहे. आम्हीच शिवसेनेचा मूळगट आहोत. त्यामुळे आम्हाला मान्यता देण्यात यावी. आमच्या 16 आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्याला स्टे देण्यात यावा. आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे पक्षप्रतोद आमचाच असावा. आम्हालाा चीफ व्हीप लागू होत नाही. विधानसभेचे उपाध्यक्ष अविश्वास ठरावावर निर्णय घेऊ शकत नाही आणि आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी केंद्राला किंवा राज्याला डायरेक्शन देण्यात यावेत, असा युक्तिवाद करण्यात येणार असल्याचं शिंदे गटाच्या वकिलाने सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या या युक्तिवादाचा शिवसेनेचे वकील कसा प्रतिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचे चार मुद्दे कोणते?

  1. आम्ही शिवसेनेचा मूळ गट आहे, त्यामुळे आम्हाला मान्यता द्यावी
  2. आमच्या 16 आमदारांना नोटिस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी. आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे पक्षप्रतोद आमचाच आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा चीफ व्हीप लागू होत नाही.
  3. विधानसभेचे उपाध्यक्ष अविश्वास ठराव आणून निर्णय घेऊ शकत नाहीत.
  4. आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी केंद्राला आणि राज्याला सूचना द्याव्यात.

कुणासाठी कोणते वकील बाजू मांडणार?

शिवसेना

रविशंकर जांध्याल अभिषेक मनु संघवी कपिल सिब्बल देवदत्त कामत

शिंदे गट

हरिश साळवे मुकुल रोहतगी मनिंदर सिंह

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.