‘शरद पवार आपल्या पक्षाबद्दल बोलत आहेत का? हे स्पष्ट करावं’, प्रादेशिक पक्षाच्या मुद्द्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

शरद पवार म्हणाले की, शिवसेना आणि आमची विचारसरणी जवळपास एकसारखीच आहे. मात्र यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ते महाराष्ट्राच्या बाबतीत असं म्हणाले असतील. शिवसेना हा पक्ष स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात उभा राहिलाय."

'शरद पवार आपल्या पक्षाबद्दल बोलत आहेत का? हे स्पष्ट करावं', प्रादेशिक पक्षाच्या मुद्द्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
शरद पवार आणि संजय राऊत यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 8:53 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्यमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुकीनंतर काही पक्ष काँग्रेससोबत जातील किंवा त्यातील काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा मोठा दावा शरद पवारांनी केलाय. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. “शरद पवारांचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांचे केरळमध्ये मंत्री आहेत. त्यांचे नागालँडमध्ये उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे ते कोणत्या प्रादेशिक पक्षावर बोलले हे मला माहिती नाही. महाराष्ट्रात असो किंवा इतर राज्यात असो, प्रादेशिक पक्षांची एक अस्मिता असते. प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्ष होण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. याचं ताजं उदाहरण तेलंगणातील बीआरएस हे आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत आहेत का? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे”, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.

शरद पवार म्हणाले की, शिवसेना आणि आमची विचारसरणी जवळपास एकसारखीच आहे. मात्र यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ते महाराष्ट्राच्या बाबतीत असं म्हणाले असतील. शिवसेना हा पक्ष स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात उभा राहिला. शिवसेना पक्षावर घाव घालण्याचे प्रयत्न कायम झाले. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबुतीने उभा राहिला. मोदींना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सभा घ्याव्या लागल्या. ते जिथे जिथे जातात तिथे पराभव होत आहे. आता मोदी हा ब्रँड राहिलेला नाही”, असं राऊत म्हणाले.

‘मोदींना ठाकरेंच्या शिवसेनेची भीती’

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे भीती वाटते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भीती वाटते”, असा दावा संजय राऊतांनी केला. “मोदींकडे विकासाचा कोणताही मुद्दा असू शकत नाही. मोदींनी गुजरातचा देखील विकास केला नाही. तो केवळ एक फुगा आहे. सत्तेच्या जोरावर अनेक प्रकल्प गुजरातला वळवले, असा फुगा तयार केला आहे. 4 जून नंतर कळेल विकास काय असतो. मोदींनी जर विकास केला असता तर त्यांना हिंदू-मुस्लिम या विषयावर मत मागण्याची गरज पडली नसती”, असं संजय राऊत म्हणाले.

नामांतरावरून संजय राऊत यांनी सरकारला टोला लागवला आहे. “उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या ते निर्णय होते. नंतरच्या सरकारने घेतलेले निर्णय काय झाले हे मला माहित नाही. मात्र त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय होते. कायदेशीररित्या त्यांनी हे निर्णय घेतले होते”, असा दावा राऊतांनी केला.

संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

“भाजपने कत्तलखान्यांकडून देखील पैसे घेतले. साडेपाचशे कोटी रुपये भाजपच्या खात्यावर जमा झाले आहेत. जे गो मांस निर्यात करतात त्यांच्याकडून त्यांनी हे पैसे घेतले आहेत”, असा आरोप संजय राऊतांनी केला. “मोदींसारखा भ्रष्ट पंतप्रधान जगाचा इतिहासात झाला नाही हे तुम्हाला लवकरच कळेल. मोदीने देश विकला”, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.