‘सरकारच्या डोळ्यांमध्ये मोतीबिंदू, शस्त्रक्रिया करा, काय वाढलंय ते उपटून काढा’, संजय राऊत यांची खोचक टीका

एक डोळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर एक डोळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्यांना अजिबात दिसत नाही", असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

'सरकारच्या डोळ्यांमध्ये मोतीबिंदू, शस्त्रक्रिया करा, काय वाढलंय ते उपटून काढा', संजय राऊत यांची खोचक टीका
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 5:05 PM

मुंबई : बारसू येथील आंदोलकांवर लाठीचार्ज झाला नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. “बारसूत लाठीचार्ज झाल्याचे चित्र माध्यमांनी दाखवले आहे. बारसूत लाठीचार्ज झाला नाही असं सरकार म्हणत असेल तर सरकारच्या डोळ्यांमध्ये जो मोतीबिंदू आलेला आहे त्याचं ऑपरेशन करावं लागेल. मी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्र उपचारतज्ज्ञ आहेत त्यांना सांगेन की, सरकारसाठी नेत्र चिकित्सा शिबिर घ्या आणि या सगळ्यांचे डोळे तपासा. त्यामध्ये काय वाढलंय ते उपटून काढा”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या हे स्पष्ट कॅमेऱ्यासमोर दिसतंय. आंदोलकांना पोलीस मारत आहेत, ते जखमी झाले आहेत. पडले आहेत, कोसळले आहेत हे माध्यमांनी दाखवलं. सगळ्यांना कोर्टात घेऊन गेले तेव्हा फक्त लष्कर आणायचं बाकी होतं. जणू अतिरेकी होते. अतिरेक्यांना घेऊन येतात अशा प्रकारचा पोलीस फौजफाटा कोर्टात उपस्थित होता. हे सरकारला दिसत नाही?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

‘उदय सामंत यांनी आम्हाला शिकवू नये’

“त्यांच्या दोन्ही डोळ्यांचे, यापैकी एक डोळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर एक डोळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्यांना अजिबात दिसत नाही”, असं संजय राऊत म्हणाले. तुम्ही काय हवंय ते करा आम्ही लाठीचार्जवर बोलतोय. मंत्री उदय सामंत यांनी आम्हाला शिकवू नये”, असंही राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“सौदी अरेबियाच्या एका इस्लामिक रिफायनरीची दलाली करत फिरताय ना त्यांनी आम्हाला सांगू नये की काय चौकशी करताय आणि काय नाही ते, आम्ही पाहू ते. आम्ही लाठीचार्ज, पोलिसांचा निर्घृण, अमानुष हल्ला यावर बोलतोय. तुम्हाला ज्या चौकशा करायच्या त्या करा. खोट्या चौकशा हा तुमचा धर्म आहे”, अशी टीका राऊतांनी केली.

‘नारायण राणे यांच्या बापाचं आहे का?’

उद्धव ठाकरे यांना रत्नागिरीत पाय ठेवू देणार नाही, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते संतापले. “नारायण राणे यांच्या बापाचं आहे का? इथे पाय ठेवू देणार नाही. तिथे पाय ठेवू देणार नाही. तुझे पाय कुठे आहेत ते बघ. अरे काय बोलताय तुम्ही, कुणाशी बोलताय? आपण केंद्रीय मंत्री आहात. आपण संयमाने बोला. पाय ठेवू देणार नाही, तुम्ही कोणाची दलाली करताय?”, असा सवाल त्यांनी केला.

“कोकणामध्ये आपण दोनवेळा पराभूत झाला आहात. लोकांनी आपल्याला पराभूत केलं आहे. लोकं निर्णय घेतील. मला कोणाविषयी व्यक्तिगत बोलायचं नाही. केंद्रीय मंत्री आहात प्रतिष्ठेत राहा, प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका”, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.

“महाराष्ट्राच आज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुका झाल्या. त्यामध्ये कुणाची धुळधान झाली याचा अभ्यास करा. संपूर्ण महाराष्ट्रात जे निकाल लागत आहेत त्यामध्ये शिवसेनेसह महाविकास आघाडी राज्यभरात घोडदौड करताना दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना कधी फार भाग घेत नव्हती. पण सगळ्या गद्दार आमदारांच्या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि शिवसेनेची पॅनल जिंकलेली आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.