एवढे विद्वान आहात तर खासदारकीला का पडले, शिवेंद्रराजे यांचा उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा

साताऱ्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

एवढे विद्वान आहात तर खासदारकीला का पडले, शिवेंद्रराजे यांचा उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 11:36 PM

सातारा : साताऱ्यात पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासून काही अंतरावर स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे स्मारक उभारले जात असून याबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले या दोघांवर निशाणा साधला आहे.

‘खासदार उदयनराजे जर एवढे विद्वान आहेत. तर ते खासदारकीला का पडले. याचे आकलन त्यांनी करावे. शिवतीर्थाचे प्रकरण हे इगोवार मधून चाललेल आहे. उदयनराजे जर स्मारकाला विरोध नाही म्हणत असतील तर त्यांचे समर्थक बनकर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना का देत आहेत. ‘

‘उदयनराजे सर्वांनाच खेळवत आहेत. शंभूराजेंचा वाईटपणा नको आणि शिवभक्तांचा पण वाईटपणा नको. सगळ्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘

‘स्वर्गीय बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. त्यांनी फार मोठे काम केले आहे. यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना माझी विनंती आहे त्यांनी सामंजसपणा दाखवण्याची गरज आहे.’

‘शिवतीर्थावर स्मारक न उभारता अन्य अनेक जागा आहेत. तिथे तुम्ही स्मारक उभे करू शकता. खासदार उदयनराजे यांच्यासोबत बोलण्यात आणि सामंजसपणा दाखवण्यात अर्थ नाही. लोक भावनांचा पालकमंत्र्यांकडून नक्कीच आदर ठेवला जाईल. शिवभक्तांचा विचाराचा योग्य निर्णय घेतील. माझी ज्यावेळेस भेट होईल त्यावेळेस नक्की सांगेन. ‘

‘लोकांचा एवढा तुमच्यावर विश्वास आहे तर तुम्ही लोकसभेला का हरलात. हा सर्व खटाटोप नगरपालिकेची सत्ता वाचवण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. एकदा नगरपालिकेची निवडणूक होऊन गेली की खासदार उदयनराजे शिवतीर्थ किंवा अन्य विषयी घेतील असं मला वाटत नाही. भूमाता दिंडी काढून ते तीन वेळा खासदार झाले. त्याचा काही उपयोग झाला नाही. ही इलेक्शनपूर्ती दिंडी होती.’

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.