सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, शॉक दिल्याशिवाय बेताल बडबड थांबणार नाही; गुलाबराव पाटलांचा घणाघात
कथित जमीन व्यवहार प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून देणारे किरीट सोमय्या आता शिवसेना नेत्यांच्या रडारवर आले आहेत. (gulabrao patil slams kirit somaiya over his allegations)
जळगाव: कथित जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता शिवसेना नेत्यांच्या रडारवर आले आहेत. सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांची बेताल वक्तव्य थांबणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. (gulabrao patil slams kirit somaiya over his allegations)
जळगाव येथे टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी हा घणाघाती हल्ला केला. किरीट सोमय्या हे बेताल बडबड करत आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. त्यांची ही बडबड शॉक दिल्याशिवाय थांबणार नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून सोमय्या खासदार झाले. आज ते ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत. हा माणूस प्रचंड एहसान फरामोश आहे, अशी सडकून टीकाही त्यांनी केली.
सोमय्यांचे आरोप
>> दोन कोटी 55 लाखांमध्ये जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली. ती ठाकरे सरकार, मुंबई महापालिका 900 कोटीत घ्यायला निघाले. त्यासाठी 345 कोटी दिले. दहिसर भूखंडाचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहे. याबाबत मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
>> अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे संबंध काय? नऊ सातबारे पुरावे म्हणून देतो, नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात 30 जमिनीचे व्यवहार, रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या 40 जमीन व्यवहारांपैकी तब्बल 30 नाईक कुटुंबासोबत केले.
>> रवींद्र वायकरांसोबत काय आर्थिक संबंध आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी किंवा रश्मी ठाकरे यांच्या प्रतिनिधींनी उत्तर द्यावे, वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशीप आहे का? ठाकरे सरकारच्या सातबाऱ्यामध्ये संबंधित जमीन लागवड योग्य नसल्याचं लिहीलं आहे. नाईक आणि ठाकरे यांच्यात काय आर्थिक हितसंबंध आहेत, हे समजलं पाहिजे. (gulabrao patil slams kirit somaiya over his allegations)
Kirit Somaiya PC Live | संजय राऊतांच्या आरेला किरीट सोमय्यांचं कारेने उत्तर, थेट ठाकरेंना खडे सवालhttps://t.co/RmI52lNPLU@rautsanjay61 @KiritSomaiya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2020
संबंधित बातम्या:
ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल
किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर
हे तर चिखलातील कमळ, सोमय्यांच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे अप्रत्यक्ष उत्तर