शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही परतणार, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये होणार प्रवेश

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता.

शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही परतणार, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये होणार प्रवेश
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 10:33 AM

सातारा : माण- खटाव या दुष्काळी तालुक्यात सहकारी कृषी उद्योगांची उभारणी करून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख (leader Ranjitsinha Deshmukh) स्वगृही काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार आहेत. मुंबईतील गांधी भवन या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) या दिग्गज नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम होणार आहे. (ShivSena leader ranjitsinha deshmukh will join Congress in presence of senior leaders)

रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2007 साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकासकामं करत माण- खटाव तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची पाळुमुळे घट्ट केली. 2003 च्या दुष्काळात सोनिया गांधी यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्याचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता.

पाणी परिषदा, संघर्ष पदयात्रा, जनजागृती अभियानाद्वारे दुष्काळी भागासाठीच्या सिंचन योजना कार्यान्वीत होण्यासाठी त्यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. प्रसंगी कृष्णा खोरे कार्यालयावर तीव्र जनआंदोलन उभारून उरमोडी आणि जिहे कठापूर या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष केला. याच भागात सहकारी उद्योगांची यशस्वीपणे उभारणी करणारे रणजित देशमुख औद्योगिक क्रांतीचे पहिले आयडाँल नेते ठरले. त्यामुळेच कायम दुष्काळी माणदेशातील जनतेच्या आर्थिक परिवर्तनासाठी रचनात्मक कामांची उभारणी करणारे भक्कम नेतृत्व म्हणून देशमुख नावारूपाला आले.

महाराष्ट्रातील सहकारी सुतगिरणी व्यवसायाला नवी दिशा देणारे रणजितसिंह देशमुख यांची कल्पकता राज्याला दिशादर्शक ठरत आहे. त्याचप्रमाणे देशमुख यांनी फिनीक्स ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माण-खटाव या दुष्काळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करत जलसंधारणाची कामे पूर्ण करून वृक्ष लागवड कार्यक्रमही राबवला. तसेच महिला व युवकांना स्वंयम रोजगार प्रशिक्षण, स्वंयम सहाय्यता गटांची निर्मिती आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिरं आदि उपक्रम सुरू केले आहेत.  (ShivSena leader ranjitsinha deshmukh will join Congress in presence of senior leaders)

दोन सूतगिरणींच्या यशस्वी सुरुवातीनंतर शुगर ग्रीड साखर कारखाना माण तालुक्यातील पिंगळी इथं 10 मेगावॅट विज प्रकल्प व 40 केएलपीडी डिस्टलरी या उपपदार्थ निर्मितीसह साखर कारखाना उभारणीच्या कामाचा शुभांरभ झाला असून पुढील एक वर्षात काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष गळीत हंगाम सुरू होईल.

मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आपल्या राजकीय हितसंबधांचा उपयोग करून देशमुख यांनी गत दुष्काळात दोन्ही तालुक्यात सुमारे 70 चारा छावण्या सुरू करून दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा दिला होता. सिंचन योजनेद्वारे कातरखटाव परिसरात शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा जटील प्रश्न मार्गी लावला. परंतू काँग्रेस विचारधारेचा पगडा असलेले रणजितसिंह देशमुख काँग्रेस बाहेर फारसे रमले नाहीत.

2019 मध्ये विधानसभा निवडणूकीत झालेल्या राजकीय उलथा- पालथी मध्ये त्यांनी ‘आमचं ठरलय’ या सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे उभा केलेल्या उमेदवाराचा प्रचार केला होता. तेव्हापासून ते अधिकृतपणे कोणात्याच राजकीय पक्षात सक्रिय नव्हते. आज रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण- खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष तसेच सातारा जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष उभारी घेईल असा विश्वास जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

इतर बातम्या – 

“बिहारच्या जनतेने लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे गुंडाराज नाकारले”, अनिल बोंडेची टीका

Bihar Election Results | काँग्रेसच्या जागा कमी होणं तेजस्वीसाठी राजकीयदृष्ट्या धोका : प्रवीण दरेकर

(ShivSena leader ranjitsinha deshmukh will join Congress in presence of senior leaders)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.