ती नटी कुठे आहे?; हाथरसच्या घटनेवरून राऊतांनी कंगनाला डिवचले
हाथरसप्रकरणी कंगना रानौतचं तोंड बंद का आहे?," असा सवालही त्यांनी केला. (Shivsena leader Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang rape)
मुंबई : उत्तरप्रदेशातील हाथसर बलात्कार प्रकरणात देशभरात संतापाची लाट उसळून आली आहे. या प्रकरणावरुन संजय शिवसेना खासदार संजय राऊतांनी अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपाई नेते रामदास आठवले यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. “एखाद्या नटीची भिंत पाडल्याचा हे प्रकरण नाही. ती नटी आता कुठे आहे ? अनेक अनुसुचित जातीतील नेते त्या नटीच्या संरक्षणासाठी पुढे आले ते कुठे आहेत?” असा संतापजनक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Shivsena leader Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang rape)
“एका नटीचं अनधिकृत बांधकाम पाडलं म्हणून तिच्या स्वागतासाठी विमानतळावर उभे असलेले दलित नेते आता कुठे आहेत? अनुसुचित जातीतील नेते कुठे गेलेत त्याची खरंतर एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, असं सांगतानाच हाथरसप्रकरणी कंगना रानौतचं तोंड बंद का आहे?,” असा सवालही त्यांनी केला.
“उत्तरप्रदेशातील मीडियाच्या स्वातंत्र्यावर सामुहिक बलात्कार केला गेला. त्या मुलीचा मृतदेह जाळला. याप्रकरणी देशभरात आक्रोश आहे. तिचे अत्यसंस्कार विधीवत झाले नाहीत. पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळण्यात आला. स्वत:चे पाप जाळण्याचे प्रयत्न केला गेला. हिंदुत्वाच्या राज्यात हा प्रकार घडला. रामराज्य म्हणवलं जातं. पण सितामाईसुद्धा आक्रोश करत असेल,” असेही ते म्हणाले.
“या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातो. त्या कुटुंबाला दहशतीत आणून धमक्या दिल्या जात आहेत. गांधी कुटुंबियांचं देशासाठी खूप मोठं योगदान आहे. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना काल जी वागणूक दिली गेली ती अत्यंत चुकीची आहे. ज्यांनी या देशासाठी घामाचा आणि रक्ताचा एक थेंबही सांडला नाही ते आज हे करत आहेत,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.
“येत्या 24 तासात आम्ही बिहार निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. ही निवडणूक लढली पाहिजे या मताचा मी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत,” असेही राऊतांनी सांगितले.
“हाथरसच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा खरेतर महिला वर्गावरील अत्याचार आहे. हाथरसच्या कन्येच्या शरीराची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही विटंबना झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन हाथरसच्या घटनेवर बोलावं. जनतेला सत्य सांगावं, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. हाथरसच्या घटनेमुळे देशभर सन्नाटा पसरला आहे. लोकांना त्यावर व्यक्त व्हायचं आहे. पण जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेच लोकं मौन आहेत,” असंही ते म्हणाले. (Shivsena leader Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang rape)
संबंधित बातम्या :
बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी