Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | सकाळच्या सभेत म्हणाले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेलेच आहेत, सायंकाळच्या सभेत म्हणाले, शाह-ठाकरेंची भेट झाली तरीही !

मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने लोक देव पाण्यात घालून बसले आहेत, ते मुंबईत परत आले आहेत. अमित शहांनाही भेटले. त्यांची कोणतीही वैयक्तिक चर्चा झाली नाही. ज्या शासकीय कामासाठी गेले होते तेवढेच काम करून परतले.

VIDEO | सकाळच्या सभेत म्हणाले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेलेच आहेत, सायंकाळच्या सभेत म्हणाले, शाह-ठाकरेंची भेट झाली तरीही !
सकाळच्या सभेत म्हणाले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेलेच आहेत
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 9:58 PM

पुणे : शिवसेना नेते संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान राऊत यांनी भोसरी आणि वडगाव शेरी येथे भाषण झाले. या दोन्ही भाषणात संजय राऊत यांचे अजित पवार यांच्याबाबत बोललेले दोन वेगळे सूर पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडला जाऊन राष्ट्रवादीला डिवचण्याचं काम केलं. पुणे जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र सायंकाळी वडगाव शेरी येथील भाषणात संजय राऊत बाजू सावरताना दिसले. (Shivsena leader sanjay raut statement on uddhav thackarey and amit shah meet)

मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने लोक देव पाण्यात घालून बसले आहेत, ते मुंबईत परत आले आहेत. अमित शहांनाही भेटले. त्यांची कोणतीही वैयक्तिक चर्चा झाली नाही. ज्या शासकीय कामासाठी गेले होते तेवढेच काम करून परतले. पुढील तीन वर्षे पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील, असे राऊत यावेळी म्हणाले. अजित पवार आपलेच आहेत, एकत्र काम कराचंय. अजित दादांनी शिवसैनिकांना समजून घ्यावं. अजितदादा पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्यासोबत आपण रीतसर बोलणी करू. मोठ्या पवार साहेबांना देखील बोलू. सन्मानीय आघाडी झाली तर उत्तमच आहे नाहीतर आपण आहोतच एकला चलो रे, असे बोलत राऊत यांनी संध्याकाळच्या सभेत मवाळ भूमिका घेतलेली पहायला मिळाली.

अजितदादांना भेटा

उपमुख्य मंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. पहाटेची घटना विसरली आहेत. तुम्हीही विसरून जा. साखर झोपेतील घटना विसरा. अजितदादांना भेटा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. अजितदादा आपली कामं करतील, असं त्यांनी सांगितलं.

संजय राऊतांचं विजय शिवतारेंना आवाहन

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील एका सभेत हे आवाहन केलं. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी स्थानिक पातळीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर राऊत यांनी भाष्य केलं. इतरांसारखं शिवसेना कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. विजय शिवतारे आम्ही तुमच्या मागे आहोत. युती होईल, महाविकास आघाडी होईल. सन्मानाने जागा वाटप झालं तर आपण एकत्र लढू, असं सांगतानाच युती, महाविकास आघाडीमध्ये भांड्याला भांड लागणार. हे नको असेल तर 150 जागा निवडून आणा. जो पर्यंत ते होत नाही तोपर्यंत गोड मानून घ्या, असं राऊत म्हणाले. (Shivsena leader sanjay raut statement on uddhav thackarey and amit shah meet)

इतर बातम्या

VIDEO | जेवणाच्या ताटावरुन उठवलं, आणखी कशावरुन उठवायचं सांगा, राऊतांनी पुन्हा राणेंना डिवचलं

VIDEO : संजय राऊतांची भरसभेत घोडे लावण्याची भाषा, एक्सपर्ट असल्याचंही वक्तव्य, नेमकं काय घडलं?

.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.