बाबरी, अमरनाथ यात्रेकरुंचा संदर्भ, पाकड्या दहशतवाद्यांना धडकी भरवणारी भाषा मराठी, सामनातून संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून 105 हुत्तात्म्यांनी बलिदान दिलं. संत ज्ञानोबा तुकोबांची भाषा मराठी आहे. महात्मा गांधींचं आंदोलन, गिरणी कामगारांचं आंदोलन याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी मराठी भाषा ही लढवय्या माणसांची भाषा आहे, असं म्हटलं.

बाबरी, अमरनाथ यात्रेकरुंचा संदर्भ, पाकड्या दहशतवाद्यांना धडकी भरवणारी भाषा मराठी, सामनातून संजय राऊतांचा भाजपला इशारा
मराठी भाषा भवन Image Credit source: twitter : CMO Maharashtra
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 7:22 AM

मुंबई : शिवसेना(Shivsena) खासदार आणि सामनाचे (Saamana) संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांन आज मराठी भाषेचा संदर्भ देत अग्रलेख लिहिला आहे. मराठी भाषा भवनाचा भूमिपूजन सोहळा गुढीपाडव्याला पार पडलाय. मरीन ड्राईव्हला भाषा भवन उभं राहिल.मात्र, अभिजात भाषेचा दर्जा मिळाव म्हणून सुरु असणारी लढाई सुरु आहे. केंद्राला मराठी संदर्भात ऐतिहासिक, प्राचीन आणि अर्वाचीन पुराव्यांचा अभ्यास या ठिकाणी करता येईल.मराठी ही शिवरायांपासून ते क्रांतिविरांची भाषा आहे. मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून 105 हुत्तात्म्यांनी बलिदान दिलं. संत ज्ञानोबा तुकोबांची भाषा मराठी आहे. महात्मा गांधींचं आंदोलन, गिरणी कामगारांचं आंदोलन याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी मराठी भाषा ही लढवय्या माणसांची भाषा आहे, असं म्हटलं.देशासाठी सीमेवर लढणारी, प्राण त्याग करणाऱ्यांची मराठी भाषा आहे. तोच लढवय्या वारसा प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत आहेत, असा उल्लेख अजित पवारांनी केल्याचा संदर्भ संजय राऊत यांनी दिला आहे.

महाभागांची मस्ती उतरवण्यासाठी स्वतंत्र कक्षाची गरज

मुंबईत व्यापार धंदा करायचा, मिळेल त्या मार्गानं पैसे कमवायचे. मराठीत व्यवहार करण्यास दुकानावर पाटी लावण्यास सांगितलं की महाभाग कोर्टात जातात. ही मस्ती उतरवण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला जाण्याची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले. भाजपच्या किरीट सोमय्यासारखे लोक कोर्टात गेले. त्या लोकांनी मराठी भाषेविरुद्ध दावा मांडलाय. मराठी भाषा भवनाच्या उभारणीत अडथळे आणण्यासाठी ईडी वापरली जाईल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. मराठी भाषा संस्कृती, मराठी भाषेचा ठसा पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठी तरणांनी उत्तुंग झेप घ्यावी यासाठी मराठी भवनातून काम व्हावं, गेली कित्येक वर्ष शिवसेना हे काम करतंय.

बाळासाहेबांनी भाषा व अस्मितेसाठी शिवसेना काढली

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करुन मराठीचा द्वेष करणाऱ्यांच्या कानफटात मारली मराठी माणसांना ओळख दिली, स्वाभिमान दिला. गर्वानं जगायला शिकवलं. मराठीच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊन आपटायची हिंमत दिली. दिल्लीच्या तख्ताला अनेकदा महाराष्ट्रापुढं झुकावं लागलं आहे. महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी 5 वर्ष लढावं लागलं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवरायांचा मावळा राष्ट्रासाठी जीवाची बाजी लावतो

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या लढाईसाठी महाराष्ट्राची निवड केली. त्याला शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे. बाबरीवर हातोडे मारुन पुन्हा होय बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, असं ठणकावणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची मराठी भाषा आहे. अमरनाथ यात्रेकरुचांच्या केसाला हात लावाल तर याद राखा या इशाऱ्यानं पाकड्या दहशतवाद्यांना धडकी भरवणारी मराठी भाषा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

इतर बातम्या

Petrol Diesel Price : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Nanded मध्ये विद्युत सहाय्यक भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप, नियमानुसार जागा भराव्या उमेदवारांची मागणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.