AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनिमूनला गेले काय?, कायंदे म्हणतात, ‘तुमच्याकडे तपास यंत्रणा, शोधू शकता’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सध्या काहीच पत्ता नाहीय. ते काय हनिमूनला गेलेत काय? अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला आता शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनिमूनला गेले काय?, कायंदे म्हणतात, 'तुमच्याकडे तपास यंत्रणा, शोधू शकता'
अमृता फडणवीस आणि मनीषा कायंदे
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 8:38 AM
Share

मुंबई :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सध्या काहीच पत्ता नाहीय. ते काय हनिमूनला गेलेत काय? अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला आता शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्हाला भाजपकडून आमदार व्हायचंय, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात. बरं राहिला प्रश्न देशमुखांचा तर तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा तुम्ही शोधू शकताय ना”, अशा शब्दात मनीषा कायंदेंनी अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.

‘अमृता वहिनींना आमदार व्हायचंय!’

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला. अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्या गायब असण्यावरुन त्यांनी काल टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज मनीषा कायंदेंनी उत्तर दिलं.

कायंदे म्हणाल्या, “सामनातून भारतीय जनता पार्टीवर टीका होत असताना अमृता वहिनी मात्र अस्वस्थ होतात. आमच्याकडे तर अशी माहिती आहे की अमृता वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय, प्रवक्ता व्हायचंय. त्यासाठी त्या भारतीय जनता पार्टीवर दबाव आणत आहेत”

‘तुमच्याकडे तपास यंत्रणा, शोधू शकता’

माजी गृहमंत्री हनिमूनला गेले की काय…? अमृता फडणवीस यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना कायंदे म्हणाल्या, “तुमच्याकडे सर्व तपास यंत्रणा आहेत. तुम्ही शोधू शकता!”. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “सामनाचे अग्रलेख वाचण्यासाठी विचारांची शक्ती लागते ती तुमच्याकडे नाही.”

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

‘त्यांचं कुठे हनिमून चाललंय माहिती नाही’

‘एक पोलीस कमिशनर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी घोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय.

ड्रग्स प्रकरणातील कारवाईचं जोरदार समर्थन

त्याचबरोबर ‘इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते’, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी एनसीबीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

विविध चौकशांवरुनही महाविकास आघाडीतील नेत्यांना उत्तर

केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर सुरु आहे. त्यावरुन महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता, तुम्ही तशी कृती करता म्हणून आरोप होतो. तुम्ही जलयुक्त शिवार योजनेवर आरोप करता, मग तुमच्यावरही आरोप होणारच, असं प्रत्युत्तर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलं आहे.

हे ही वाचा :

माजी गृहमंत्री काय हनीमुनला गेले का? अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.